मोदींचा कुरेशीवर तर बाबा रामदेंवर काँग्रेसचा हल्लाबोल

मांसाचा व्यापारी मोईन कुरेशीचा केंद्रातल्या चार मंत्र्यांशी असलेल्या संबंधांचा झी मीडियानं पर्दाफाश केल्यानंतर आता नरेंद्र मोदींनीही सरकारवर हल्लाबोल केलाय. दरम्यान, काळ्या पैशांच्या मुद्यावरुन मोहीम उघडणारे योगगुरु बाबा रामदेव आता स्वत:च काळ्या पैशांच्या मुद्यावरून अडचणीत आलेत. त्यांना भाजपने पाठिशी घातलेय तर काँग्रेसने हल्लाबोल केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 18, 2014, 07:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मांसाचा व्यापारी मोईन कुरेशीचा केंद्रातल्या चार मंत्र्यांशी असलेल्या संबंधांचा झी मीडियानं पर्दाफाश केल्यानंतर आता नरेंद्र मोदींनीही सरकारवर हल्लाबोल केलाय. दरम्यान, काळ्या पैशांच्या मुद्यावरुन मोहीम उघडणारे योगगुरु बाबा रामदेव आता स्वत:च काळ्या पैशांच्या मुद्यावरून अडचणीत आलेत. त्यांना भाजपने पाठिशी घातलेय तर काँग्रेसने हल्लाबोल केलाय.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी झी मीडियाच्या वृत्ताचा हवाला देत ऑपरेशन हवालावरती काँग्रेसक़डून खुलाशाची मागणी केलीय. उत्तर प्रदेशातल्या कानपूरच्या सभेत त्यांनी ऑपरेशन हवाल्याचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी कुरेशीचे युपीए सरकारमधले चार मंत्री आणि १० जनपथशी असेलेल्या संबंधांचा खुलासा झाला असून सरकारला याबाबत उत्तर द्यावच लागेल असं सांगितलंय.
काळ्या पैशांच्या मुद्यावरुन मोहीम उघडणारे योगगुरु बाबा रामदेव आता स्वत:च काळ्या पैशांच्या मुद्यावरून अडचणीत आलेत. बाबांचा भाजपचे अलवरमधील उमेदवार महंत चांदनाथ यांच्यासोबतचा पैशांच्या देवाणघेवाणीसंदर्भातला व्हिडिओ उघड झालाय. एका प्रेस कॉन्फरन्सआधी मीडियाच्या माईकद्वारे त्यांची ही बातचीत रेकॉर्ड झाली. त्यामुळे आता रामदेवबाबांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झालाय. याप्रकरणी बाबा रामदेवांवर काँग्रेसनं टीका केलीय. तर भाजपनं बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केलाय.
बाबा रामदेवांचा खरा चेहरा समोर आलाय, असं सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी हल्लाबोल केलाय. तर भाजपनं त्यांचा बचाव केलाय. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांनी बलात्कारप्रकरणी केलेल्या विधानावर नरेंद्र मोदी यांनी टीका केलीय. बलात्कारसारख्या संवेदनशील मुद्यावरही मुलायम सिंग यादव किती असंवेदनशील आहेत अस मोदी यांनी म्हटलय. तर याचबरोबर मोदी यांनी काँग्रेसवरही निशाना साधला. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला खातही उघडता येणार नसल्याच मोदी म्हणाले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.