नग्न पोस्टर चोरण्याच्या आरोपावर आमीरचं स्पष्टीकरण

मिस्टर परफेक्ट आमीर खानचं 'पीके' सिनेमाचं नग्न पोस्टर सोशल मीडियात चर्चेत आहे. या पोस्टरवर आमीर खानने अखेर स्पष्टीकरण दिलं आहे.

Updated: Aug 7, 2014, 05:11 PM IST
नग्न पोस्टर चोरण्याच्या आरोपावर आमीरचं स्पष्टीकरण title=

मुंबई : मिस्टर परफेक्ट आमीर खानचं 'पीके' सिनेमाचं नग्न पोस्टर सोशल मीडियात चर्चेत आहे. या पोस्टरवर आमीर खानने अखेर स्पष्टीकरण दिलं आहे.

या पोस्टरवर बोलतांना आमीर खान म्हणतो, दिग्दर्शक राजीव हिराणी हा खूप हुशार माणूस आहे, पोस्टरमध्ये चित्रपटाचा सर्व अर्क आहे.

तुम्ही चित्रपट जेव्हा पाहणार, तेव्हाचं तुम्हाला याच्यातलं गुपित कळणार असल्याचंही आमीर खानने म्हटलं आहे.

पीके' सिनेमाचं नग्न पोस्टर सोशल मीडियात चर्चेत आहे. मात्र आमीर खानने पोस्टरवर दिलेली पोझ ही पहिलीच नाही.

आमीरने कोणत्या फोटोवरून ही प्रेरणा घेतली, तर काही नेटीझन्सच्या मते चोरी केली, तो फोटोही आता शेअर व्हायला सुरूवात झाली आहे.

आमीरने कोणत्या फोटोवरून ही प्रेरणा घेतली, तर काही नेटीझन्सच्या मते चोरी केली, तो फोटोही आता शेअर व्हायला सुरूवात झाली आहे.

खरं तर आमीर खानने ज्या पोझमध्ये फोटो काढला आहे, तसं पोस्टर सत्तरच्या दशकात छापलं गेलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.