मराठी भाषेतला पहिला शिलालेख होतोय इतिहास जमा

 मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असतना दुसरीकडे मराठी भाषेतला पहिला शिलालेख मात्र आजही धूळ खात पडलाय. जागतीक मराठी भाषा दिनानिमित्ती या शिलालेखावरील धूळ झटकण्याचा आणि राज्य शासनाचे डोळे उघण्याचा हा छोटासा प्रयत्न.

Updated: Feb 27, 2015, 11:57 AM IST
मराठी भाषेतला पहिला शिलालेख होतोय इतिहास जमा title=

अलिबाग :  मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असतना दुसरीकडे मराठी भाषेतला पहिला शिलालेख मात्र आजही धूळ खात पडलाय. जागतीक मराठी भाषा दिनानिमित्ती या शिलालेखावरील धूळ झटकण्याचा आणि राज्य शासनाचे डोळे उघण्याचा हा छोटासा प्रयत्न.

रायगड जिल्ह्यातील आक्षी या गावातला हा शिलालेख श्रवण बेळगोळ येथील शिलालेखाहून प्राचीन असल्याचं इतिहास संशोधकांनी स्पष्ट केलंय.. शके 934 म्हणजे इसवीसन 1012 मध्ये याची निर्मिती करण्यात आली.. मात्र मराठी भाषेतला हा पहिला शिलालेख आजही उन वारा पावसाचा माराखात विलुप्त होण्याच्या मार्गावर उभा आहे..

 पश्चीम समुद्रपती श्री कोकण चक्रवर्ती केसीदेवरायांच्या महाप्रधान भरजु सेणुई याने हा शिलालेख तयार करवून घेतला.. या यावर देवनागरी लिपीत नऊ ओळी कोरण्यात आलेल्या आसून महालक्ष्मीच्या बोडणासाठी दर शुक्रवारी नऊ कुवली देण्याचा उल्लेख यावर करण्यात आलाय... शिलालेखावर चंद्र, सूर्याच्या प्रतिमा आहेत. गावक-यांना यावरील मराठी भाषेचं ऐतिहासीक महत्व माहिती नसल्यानं त्याची पूजा केली जाते.

 पुरातत्व खात्यानंही या शिलेलेखाची दखल घेतलीये.. मात्र त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी ना पुरातत्व विभागानं काही प्रयत्न केलेत ना स्वताला मराठीचे कैवारी म्हणवणा-यांनी.. उन वारा आणि पावसाच्या मा-यात या शिलालेखावरील बरीचशी अक्षरं आता नष्ट झालीत.. आणि जर यापुढेही त्याचं योग्य संवर्धन आणि संरक्षण झालं नाही तर इतिहासाचा हा अनमोल ठेवा काळाच्या पडद्याआड कायमचा नष्ट होईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.