आता अजित पवारांना पाडण्याचं लक्ष्य; चंद्रकांत पाटलांचा 'इरादा पक्का'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 04:44 PM2019-06-25T16:44:08+5:302019-06-25T16:52:48+5:30

बारामती मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्याच्या व्युहरचनेत आम्ही थोडे कमी पडलो.

Target for Ajit Pawar's defeat in upcoming Vidhan Sabha elections: Chandrakant Patil | आता अजित पवारांना पाडण्याचं लक्ष्य; चंद्रकांत पाटलांचा 'इरादा पक्का'

आता अजित पवारांना पाडण्याचं लक्ष्य; चंद्रकांत पाटलांचा 'इरादा पक्का'

Next
ठळक मुद्दे दर १५ दिवसाला बारामती मतदारसंघात जाणार लोकसभेतील सहाही विधानसभा मतदारसंघांत जोर लावणार

पिंपरी : लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा निसटता विजय झाला. बारामती, भोर व इंदापूर मतदारसंघांत आम्ही कमी पडलो. आगामी विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पराभव करण्याचे टार्गेट असून, त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीत सुळे यांच्या पराभवाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 
 पुण्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर पाटील यांनी मंगळवारी पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या कार्यालयाला भेट दिली. विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, सभागृहनेते एकनाथ पवार आदी उपस्थित होते. 
पाटील म्हणाले, बारामती मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्याच्या व्युहरचनेत आम्ही थोडे कमी पडलो. तसेच केवळ निवडणुकीपुरते बारामतीमध्ये येतात असे मतदारांना वाटू नये. यासाठी दर १५ दिवसाला बारामती मतदारसंघात जाणार आहे.  लोकसभेतील सहाही विधानसभा मतदारसंघांत जोर लावणार आहे.

Web Title: Target for Ajit Pawar's defeat in upcoming Vidhan Sabha elections: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.