CCD Owner Missing :5 लाखांची गुंतवणूक अन् बनले अब्जाधीश; कॉफी किंग व्ही.जी सिद्धार्थ यांचा जीवन संघर्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 11:47 AM2019-07-30T11:47:46+5:302019-07-30T13:02:04+5:30

व्ही.जी सिद्धार्थ...भारतातील एक अशा यशस्वी उद्योजकाचं नावं. जे त्यांच्या नावाने नाही तर कामाने प्रसिद्ध आहेत.

Story Of Coffee King VG Siddhartha's Life Struggle | CCD Owner Missing :5 लाखांची गुंतवणूक अन् बनले अब्जाधीश; कॉफी किंग व्ही.जी सिद्धार्थ यांचा जीवन संघर्ष 

CCD Owner Missing :5 लाखांची गुंतवणूक अन् बनले अब्जाधीश; कॉफी किंग व्ही.जी सिद्धार्थ यांचा जीवन संघर्ष 

Next

मुंबई - प्रसिद्ध कॉफी उद्योगातील कॅफे कॉफी डे(CCD) चे मालक व्ही. जी सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता झाले आहे. उद्योगातील अडचणींमुळे गेल्या काही दिवसांपासून व्ही.जी सिद्धार्थ चिंतेत होते. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. बेपत्ता होण्याआधी त्यांनी लिहिलेल्या पत्रात मी एक उद्योजक म्हणून अयशस्वी ठरलो असं सांगितले. मात्र त्यांच्या जीवनातील संघर्षावर नजर टाकली तर त्यात कुठेही त्यांना अपयश आल्याचं दिसत नाही

व्ही.जी सिद्धार्थ...भारतातील एक अशा यशस्वी उद्योजकाचं नावं. जे त्यांच्या नावाने नाही तर कामाने प्रसिद्ध आहेत. कॅफे कॉफी डे या नावाजलेल्या उद्योगाचे ते संस्थापक आहेत. 5 लाखांपासून सुरु केलेला उद्योग आज देशातील प्रत्येक शहरात वाढलेला आहे. कॉफी किंग म्हणून व्ही.जी सिद्धार्थ यांची ओळख आहे. आज त्यांच्याकडे 1 अरब डॉलरपेक्षा अधिक संपत्ती आहे. त्यांच्या जीवनाचा संघर्ष अनेकांना प्रेरणादायी आहे. 

व्ही.जी सिद्धार्थ यांचा जन्म कर्नाटकातील चिकमंगलुरु कुटुंबात झाला. कॉफी उत्पादन हा त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय होता. मात्र फक्त कॉफी उत्पादन करुन जीवन जगण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करुन मोठा उद्योग उभारण्याचं त्यांचे स्वप्न होतं. 21 वर्षाचं असताना सिद्धार्थ यांनी वडिलांकडे मुंबईला जाण्यासाठी परवानगी मागितली. वडिलांनी त्यांना 5 लाख रुपये व्यवसाय उभा करण्यासाठी दिले. मात्र जर तो या उद्योगात अयशस्वी झाला तर त्यांना पुन्हा घरी परतून कुटुंबाच्या व्यवसायात हातभार लावावा लागेल असं वडिलांनी व्ही.जी सिद्धार्थ यांना बजावलं होतं. 

सिद्धार्थ यांनी 3 लाख रुपये जमीन खरेदी करुन बाकी 2 लाख रुपये बँकेत जमा केले. त्यानंतर व्ही.जी सिद्धार्थ मुंबईला आले आणि जेएम फायनॅन्शियल सर्व्हिसमध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. याठिकाणी 2 वर्ष नोकरी करतानाच त्यांनी शेअर बाजाराची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. सिद्धार्थ यांची नोकरी चांगल्यापद्धतीने सुरु होती मात्र त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरु करायचा होता. त्यामुळे नोकरी सोडून ते बंगळुरुला परतले. बँकेत ठेवलेले 2 लाख काढून कंपनी उभारण्याचा निर्णय घेतला. 1996 मध्ये सिद्धार्थ यांनी कॉफी कॅफे डे कंपनीची सुरुवात केली. त्यांच्या या कंपनीने भारतात कॉफी उद्योगाला नवीन दिशा दिली. कंपनीकडे आज 1750 केफे आहेत. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, दुबई आणि चेक रपब्लिक याठिकाणी कंपनीचे आऊटलेक आहेत. 

जवळपास 5 हजार पेक्षा अधिक लोक त्यांच्याकडे कामाला आहेत. कॉफी कॅफे डे चे प्रतिस्पर्धी टाटा ग्रुपचे स्टारबक्स तसेच चेंस बरिस्ता, कोस्टा कॉफी हे आहेत. स्टारबक्सचे भारतात 146 कॅफे आहेत. मात्र गेल्या 2 वर्षापासून CCD च्या विस्तारात मंदी आली. कर्ज वाढले उद्योगातील आव्हाने वाढली त्यामुळे सीसीडीला यंदाच्या आर्थिक वर्षात 90 कॅफे बंद करावे लागले. सध्या कोका-कोला कंपनी  सीसीडीचे कंपनीचा मोठा हिस्सा विकत घेण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Web Title: Story Of Coffee King VG Siddhartha's Life Struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.