हा भाग लोकसभा निवडणूक २०१९ मधील तरुणांचे प्रतिनिधित्व, भारतीय निवडणुकांमधील तरुणांचे सहभागाचे महत्त्व, मतदानाच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेले उपाय, सध्याच्या राजकीय वातावरण आणि मतदानाची माहिती याविषयी युवा भारतीयांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एडीआर च्या प्रयत्नांवर केंद्रित आहे.

टीप: आपण आम्हाला अभिप्राय, टिप्पण्या आणि सूचना [email protected] वर पाठवू शकता.

पॉडकास्ट मराठी स्क्रिप्ट

प्रस्तावना :- (00.09)

एडीआर स्पिक्स च्या अजून एका भागामध्ये आपले स्वागत आहे. माझे नाव समीना शेख आहे आणि मी एडीआर मध्ये प्रोग्राम एग्जीक्यूटिव आहे.

आजचा भाग लोकसभा निवडणूक २०१९ मधील तरुणांचे प्रतिनिधित्व, भारतीय निवडणुकांमधील तरुणांचे सहभागाचे महत्त्व, मतदानाच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने केलेले उपाय, सध्याच्या राजकीय वातावरण आणि मतदानाची माहिती याविषयी युवा भारतीयांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एडीआर च्या प्रयत्नांवर केंद्रित आहे.

पृष्टभूमी आणि आढावा :-  (00.43)

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तरुण मतदारांमध्ये राजकीय हिताचे पुनरुत्स्थान दिसून आले, ज्याने राजकीय पक्षांनी तरुणांना एकत्रित करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन मोहिमेवर ताबा घेण्यास प्रेरित केले.  लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये सुमारे ४.५ कोटी पात्र मतदार वयाच्या २५ वर्षांपेक्षा कमी होते आणि १.५ कोटी १८-१९ वर्षाच्या वयोगटातील प्रथमच मतदान करणारे होते. तज्ज्ञांकडून असा अंदाज लावला जात आहे की येत्या काही वर्षांत तरुणांचा राजकीय सहभाग कमी होण्याची शक्यता नाही.

जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्या भारतात आहे परंतु या देशाचे नेतृत्व बहुसंख्य वृद्ध नेते करतात. शिवाय, हे देखील उल्लेखनीय आहे की राजकीय पक्षांनी निवडणुका मोहिमेद्वारे, राजकीय प्रदर्शने, रॅली, नवीन सदस्यांची भरती आणि विद्यार्थी संघटना निवडणुकांच्या माध्यमातून तरुणांना लक्ष्य केले, तरीही त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले. उदारणार्थ, एडीआरच्या "प्रशासनाचे मुद्दे आणि मतदारांचे वर्तन यावरील अखिल भारतीय सर्वेक्षण २०१८ नुसार, २.७० लाख उत्तरदात्यांपैकी ४६.८० टक्के मतदारांनी "रोजगाराच्या उत्तम संधी" ला प्रथम प्राधान्य दिले. तथापि, त्यांनी रोजगाराच्या संधीसाठी सरकारच्या प्रदर्शनाचे रेटिंग "सरासरीपेक्षा कमी" म्हणजेच ५ च्या प्रमाणात २.१५ रेटिंग दिले. विविध अधिकृत अहवालांमध्ये असे म्हटले आहे की भारतीय तरुण बेरोजगारीशी झुंज देत आहेत आणि साथीच्या रोगामुळे परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे.

(02.32)

सध्याच्या लोकसभेत न्यूनतम युवा प्रतिनिधित्व समजून घेणे फार महत्वाचे आहे कारण ते लाखो भारतीय तरुणांच्या विचार प्रक्रियेचे प्रतिनिधित्व करतात. निवडणूक/विधिमंडळांमध्ये युवकांचे प्रतिनिधित्व निश्चित करण्यासाठी एडीआरने युवा उमेदवार आणि खासदारांच्या डेटाचे विश्लेषण केले ते २५ ते ३५ वर्ष वयोगटातील होते, ज्यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. तरुण उमेदवारांचे काही महत्त्वपूर्ण विश्लेषण खालीलप्रमाणे आहेत:-

  1. निवडणूक लढणारे १८.७ टक्के उमेदवार २५-३५ वयोगटातील होते.
  2. १२ टक्के युवा उमेदवारांवर गुन्हेगारी प्रकरण होते, तर ९ टक्क्यांवर गंभीर गुन्हेगारी प्रकरण होते.
  3. ७ टक्के युवा उमेदवार कोट्याधीश होते, तर युवा उमेदवारांची सरासरी मालमत्ता रु. ७३.६० लाख होती.
  4. ४८ टक्के युवा उमेदवारांची शैक्षणिक योग्यता पदवीधर आणि त्याहून अधिक होते, ४७ टक्के १२ वी उत्तीर्ण आणि त्याहून कमी होते, तर २ टक्के अशिक्षित होते.

एडीआरने ५४३ पैकी ५४२ खासदारांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण केले, त्यापैकी केवळ ३१ खासदारांचे वय २५ ते ३५ दरम्यान होते. या ३१ खासदारांचे काही विश्लेषण खालीलप्रमाणे आहे:-

  1. ४८ टक्के युवा खासदारांनी त्यांच्यावर गुन्हेगारी प्रकरण घोषित केले, तर २९ टक्के गंभीर गुन्हेगारी प्रकरण घोषित केले.
  2. त्यापैकी ६१ टक्के खासदार कोट्याधीश होते आणि युवा खासदारांची सरासरी मालमत्ता रु. ५.६६ कोटी होती.
  3. ८१ टक्के युवा खासदारांची शैक्षणिक पात्रता पदवीधर आणि त्याहून अधिक होती, तर १९ टक्के १२वी उत्तीर्ण आणि त्याहून कमी होते.

(04.36)

हे स्पष्ट आहे की तरुणांचा सहभाग वाढला आहे परंतु त्यांचा बहुसंख्य सहभाग सुनिश्चित करणे सर्वंकष आहे कारण ते भारताच्या अधिकांश लोकसंख्येचा बांधा आहे आणि सरकारच्या धोरणांवर त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडेल.  हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की काही युवा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांबद्दल समाधानी नव्हते आणि नोटा पर्यायासोबत सुद्धा. नोटा हा मतदानाचा अपव्यय आहे या विश्वासाने ते उभे आहेत आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या मतदानाच्या हक्कांचा वापर करणे टाळले पाहिजे.

भारताचे १७वे मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. एस. वाई. कुरेशी यांनी त्यांच्या पुस्तकात " एन अंडोकॉन्मेन्ट वंडर: द मेकिंग ऑफ द ग्रेट इंडियन इलेक्शन" या विषयावर चर्चा केली आहे की तरुणांनी “तक्रार करणे थांबविणे आणि मतदान सुरू करणे”का आवश्यक आहे. त्यांना माहित असावे:

  • अभ्यास करून त्यांनी त्यांच्या जीवनाची आणि देशाची जबाबदारी का घ्यावी.
  • त्यांनी लोकशाहीला हलक्यात नाही घेतले पाहिजे आणि त्यांच्या मतदानाच्या अधिकाराकडे दुर्लक्ष करू नये.
  • त्यांना हे लक्षात ठेवावे लागेल की युवाशक्तीनेच देशासाठी स्वातंत्र्य आणि लोकशाही मिळवण्याच्या स्वातंत्र्यलढ्याला सुरुवात केली होती आणि लोकशाहीची रक्षा करण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर आहे.
  • युवा सशक्तीकरणाच्या दिशेने पहिले महत्त्वाचे आणि ठोस पाऊल म्हणजे आपला देश, आपले राज्य, आपली नगरपालिका, आपली पंचायत, आपले गाव कसे चालवायचे या निर्णयावर प्रभावित करू शकतो.
  • मोठ्या प्रमाणावर तरुणांचा सहभाग लोकशाहीला कसा महत्व देईल आणि मतदार आणि मतदानाच्या दरम्यान 'संवाद' करण्याचे प्रकार कसे बदलतील?

(06.23)

जेव्हा भारतीय निवडणूक आयोगाने पाहिले की १८ ते २० वर्ष मतदार नोंदणीचे प्रमाण सुमारे १२ टक्के आहे, तेव्हा त्यांनी मतदार जागृतीसाठी “युवा संघ”, ज्याला युवा म्हणून ओळखले जाते याची ओळख करून दिली, जेणेकरून २०११ मध्ये बेपत्ता व गैर- मतदारांची ओळख पटविणे आणि त्यांना मतदानास प्रोत्साहित करणे.  "सुव्यवस्थित मतदार शिक्षण आणि मतदार सहभाग" अंतर्गत सामान्यपणे "स्वीप" या नावाने ओळखले जाते. निवडणूक आयोगाने "निवडणूक शाळे" च्या माध्यमातून शैक्षणिक संस्था तसेच ग्रामीण समुदायांमध्येही" निवडणूक साक्षरता क्लब" सुरु केले आहे.

(07.06)

तरुणांना राजकीय आणि निवडणूक सुधारणेत प्रेरित करण्यासाठी, त्यांना सूचित करण्यासाठी आणि त्यात सहभागी होण्यासाठी एडीआरने "हम बदलने अपना भारत" हा युवा संदेश कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट भारतीय तरुणांना आज भारतीय लोकशाहीसमोर असलेल्या आव्हानांविषयी शिक्षित करणे आहे. आमच्या राज्य समन्वयकांच्या पाठिंब्याने आम्ही हा कार्यक्रम देशभरातील जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी वचनबद्ध आहोत. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपण आमच्या  adrindia.org  या वेबसाइटवर भेट देऊ शकता.

(07.46)

अशा प्रकारे हे निष्कर्ष काढले गेले आहे की तरुणांच्या मागण्या ऐकल्या पाहिजेत आणि तरूणांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित केले जाणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांनी स्वच्छ प्रतिमा असलेल्या तरुण राजकारण्यांना संतुलित आणि लोकसंख्येनुसार वैविध्यपूर्ण सरकार राखण्यासाठी अधिक संधी द्याव्यात.

(08.08)

आजच्या भागासाठी एवढेच, मला आशा आहे की आपणा सगळ्यांना हे उपयोगी आणि रोचक वाटले असेल. जर आपणास आमचे काम आवडले असेल तर आमच्या वेबसाईड www.adrindia.org  वर पॉडकॉस्ट ची सदस्यत्व घ्या आणि [email protected]  वर आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्यास विसरू नये. अजून एका अप्रतिम भागा सोबत दोन आढवड्यानी पुन्हा उपस्थित होऊ. 

तोपर्यंत संपर्कात रहा आणि ऐकण्यासाठी धन्यवाद.

*****************

© Association for Democratic Reforms
Privacy And Terms Of Use
Donation Payment Method