एक्स्प्लोर

मुंबईतील 'कराची स्वीट्स'चं नाव बदला; शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांची मागणी

मुंबईतील 'कराची स्वीट्स'चं नाव बदलण्याची शिवसेनेच्या नितीन नांदगावकर यांनी मागणी केली आहे. नादगांवकरांच्या मागणीला शिवसेनेचं समर्थन आहे का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

मुंबई : मुंबईतील कराची बेकरीच्या नावाला शिवसेनेच्या नितीन नांदगावकरांनी आक्षेप घेतला आहे. वांद्रे येथील कराची बेकरीचं नाव बदला, अशी मागणी नांदगावकरांनी केली आहे. नांदगावकर यांच्या मागणीला शिवसेनेचं समर्थन आहे का? असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे. कराची हे नाव पाकिस्तानमधील आहे आणि या नावामुळे आपल्या सैनिकांचा अपमान होतोय, असं सांगत कराची बेकरीचं नाव बदलण्याची मागणी नितीन नांदगावकरांनी केली आहे.

कराची स्वीट्स ही संपूर्ण देशात पसरलेली फूड चैन आहे. साधरणतः प्रमुख शहरं आणि महानगरांमध्ये कराची स्वीट्सचे प्रोडक्ट्स विकणारे अनेक आउटलेट्स आहेत. मुंबईतही अनेक ठिकाणी कराची बेकरीचे आउटलेट्स आहेत. या बेकरीच्या नावातील 'कराची' या शब्दाला आक्षेप घेत शिवसेनेचे नितीन नांदगावकर यांनी विरोध केला आहे. तसेच मुंबईतील कराची बेकरीच्या सर्वच आउटलेट्सला त्यांनी इशारा दिला आहे. त्यांनी नाव रद्द करा किंवा त्यातील कराची हा शब्द काढून टाका, अशी मागणीही केली आहे.

नितीन नांदगावकर म्हणाले की, 'मुंबई आणि महाराष्ट्रात कराची नावाने कोणतेही व्यवसाय चालणार नाहीत. यामुळे पाकिस्तानला तुम्ही एकप्रकारे पाठिंबा देत असल्याचं निदर्शनास येतं. महाराष्ट्रात राहायचं असेल, तर असं नाव चालणार नाही.' यासंदर्भात नितीन नांदगावकर काही बेकरीच्या मालकांशी बोललेले असून सुरुवातीला त्यांनी विनंती केली आहे. तसेच काही बेकरीच्या मालकांनी नितीन नांदगावकरांच्या या मागणीला मान्यता देत आम्ही हे नाव काढू असंही सांगितलं आहे. या मालकांनी आणि नितीन नांदगावकर यांनी आणि या सेंटर्सच्या मालकांनी दिल्ली आणि हैदराबाद येथील सेंटर्सवर पत्रव्यवहार केला आहे.

पाहा व्हिडीओ : कराची स्वीटचं नाव बदला, शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांची दुकान मालकाकडे मागणी

दरम्यान, 2010मध्ये शिवसेनेनं अशाच पद्धतीनं बँगलोर बेकरीच्या नावाला आक्षेप घेतला होता. त्यानंतर अय्यंगार बेकरी या नावाने या बेकरीचे आउटलेट्स मुंबईत सुरु करण्यात आले. तसाच मुद्दा नितीन नांदगावकर यांनी उचलला असून त्यांनी तुमच्या कुटुंबियांचं नाव द्या. पण पाकिस्तानातील शहराचं नको, असं म्हटलं आहे.

मनसेचाही 'कराची' या नावाला आक्षेप 

मनसे पदाधिकारी यांनी आज मुंबईतील कराची बेकरीमध्ये समोर जाऊन आंदोलन केले. कराची नावाला मनसेचा विरोध असून हे नाव बदलावे ही मागणी मनसे कडून केली जात आहे. यासाठी मनसेने कराची बेकरीमध्ये जाऊन निवेदन देऊन हे नाव बदलण्यास संगितले आणि यावेळी कराची बेकरीमधील पॅकेट्स बाहेर टाकून निषेध व्यक्त करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah on Lok Sabha Elections :
"महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा जिंकू, देशातही NDA ला बहुमत"
Horror Comedy Movie OTT : स्मशानात रिलीज झालेला हॉरर कॉमेडीपटाचा टीझर,ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय चित्रपट
स्मशानात रिलीज झालेला हॉरर कॉमेडीपटाचा टीझर,ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय चित्रपट
Vidhan Parishad Election 2024: कोकण पदवीधरमधून मनसेचे अभिजीत पानसे महायुतीचे उमेदवार? निरंजन डावखरेंचा पत्ता कट?
कोकण पदवीधरमधून मनसेचे अभिजीत पानसे महायुतीचे उमेदवार? निरंजन डावखरेंचा पत्ता कट?
मोठी बातमी! मालेगावात माजी महापौरावर गोळीबार, तीन गोळ्या झाडल्या, हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी 
मोठी बातमी! मालेगावात माजी महापौरावर गोळीबार, तीन गोळ्या झाडल्या, हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Car Accident Case : ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससूनचे दोन डॉक्टर निलंबितTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 27 May 2024 : ABP MajhaAbhijit Panse MNS : कोकणातून अभिजीन पानसे मनसेकडून पदवीधरसाठी मैदानातAmit Shah on Lok Sabha Elections :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah on Lok Sabha Elections :
"महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा जिंकू, देशातही NDA ला बहुमत"
Horror Comedy Movie OTT : स्मशानात रिलीज झालेला हॉरर कॉमेडीपटाचा टीझर,ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय चित्रपट
स्मशानात रिलीज झालेला हॉरर कॉमेडीपटाचा टीझर,ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय चित्रपट
Vidhan Parishad Election 2024: कोकण पदवीधरमधून मनसेचे अभिजीत पानसे महायुतीचे उमेदवार? निरंजन डावखरेंचा पत्ता कट?
कोकण पदवीधरमधून मनसेचे अभिजीत पानसे महायुतीचे उमेदवार? निरंजन डावखरेंचा पत्ता कट?
मोठी बातमी! मालेगावात माजी महापौरावर गोळीबार, तीन गोळ्या झाडल्या, हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी 
मोठी बातमी! मालेगावात माजी महापौरावर गोळीबार, तीन गोळ्या झाडल्या, हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी 
OTT Release This Week : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; बहुप्रतिक्षीत 'पंचायत 3' अन् बरचं काही...
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; बहुप्रतिक्षीत 'पंचायत 3' अन् बरचं काही...
Shreyas Iyer : केकेआरनं ट्रॉफी जिंकली, श्रेयसच्या एका कृतीवर चाहते खूश, आयपीएल विजेत्या कॅप्टननं काय केलं? Video
Shreyas Iyer : कॅप्टन कसा असावा श्रेयसनं दाखवलं, आयपीएल ट्रॉफीचा पहिला मान रिंकू सिंगला, पाहा व्हिडीओ
Nashik ST Bus Accident : नाशिकमध्ये पिंपळगाव टोल नाक्याजवळ बस आणि ट्रकची धडक, 20 प्रवासी जखमी
टोल नाक्यावर उभ्या ट्रकला एसटी बस धडकली, नाशिकमधील अपघातात 20 प्रवासी जखमी
Mumbai News: BMC ने  कंत्राट रद्द केलं, ठेकेदाराने पालिकेलाच कोर्टात खेचलं, 64.60 कोटींचा दंडही थकवला
BMC ने कंत्राट रद्द केलं, ठेकेदाराने पालिकेलाच कोर्टात खेचलं, 64.60 कोटींचा दंडही थकवला
Embed widget