दोन मोबाईल चोरट्यांना अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकणाऱ्या दुचाकीवरील चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि. 29) सायंकाळी चारच्या सुमारास भोसरी एमआयडीसी मधील अनुकूल कंपनीसमोर घडली.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’af4c8df4-adac-11e8-ac1e-c9b613a27b08′]

या प्रकरणी शरद शांताराम खवणेकर (२४, रा. हनुमानवाडी, आळंदी-चाकण रोड, आळंदी) याने  फिर्याद दिली आहे. तर शुभम नीतीन काळभोर (१८), अमर राम पोटभरे (२०, दोघे रा. भिमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद हे बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास भोसरी एमआयडीसी मधील अनुकूल कंपनी समोरुन मोबाईलमध्ये आलेले मेसेज वाचत पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या शुभम आणि अमर यांनी शरदचा मोबाईल हिसकावून नेला. यावरुन शरद यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी आरोपींचा तपास घेत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.तपास  एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे करीत आहेत.

येरवडा परिसरातील लॉजमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश