पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्याची निर्घृण हत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – माहिती अधिकार कार्यकत्याचे अपहरण करुन त्यांची हत्या करुन मुळशी तालुक्यातील मुठा गावाच्या हद्दीत दरीत मृतदेह टाकून दिल्याचे आढळून आले आहे.

विनायक सुधाकर शिरसाट (वय ३२) असे त्यांचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार ३० जानेवारी रोजी आली होती.

विनायक शिरसाट हे शिवणे उत्तमनगर परीसारात राहायला होते. ते आरपीआय चे उपाध्यक्ष होते. माहिती अधिकार कायद्याचा वापर करुन वडगाव धायरी सह परीसरातील अवैध बांधकाम करणाऱ्यांविरूद्ध आवाज उठवून त्यांचे बांधकाम पाडण्यास भाग पाडल्याची माहिती समोर येत आहे.

ओळखीच्या मित्रांनीच केले ‘त्या’ माहिती अधिकार कार्यकर्त्याचे अपहरण 

याप्रकरणी विनायक शिरसाट यांचे भाऊ किशोर शिरसाट यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यावरुन भारती विद्यापीठ पोलीस अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. तपास करीत असताना त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन मुठा गावाच्या हद्दीत मिळून आले. गेल्या काही दिवसांपासून भारती विद्यापीठ पोलीस त्यांचा शोध घेत होते. पिरंगुट ते लवासा या रोडवरील मुठा गावापासून काही अंतरावर असलेल्या घाटात खोल दरीत सोमवारी दुपारी एक कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. त्याच्या अंगावरील कपडे आणि खिशातील मोबाईल यावरुन त्यांचे भाऊ किशोर यांनी हा मृतदेह विनायक शिरसाट यांचा असल्याचे ओळखले. हा मृतदेह कुजलेला असून त्यांचे अपहरण झाल्यानंतर येथे आणून त्यांचा खुन करुन त्यानंतर मृतदेह दरीत टाकून दिला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.