स्क्वॅाशमध्ये भारताने खातं उघडलं

जकार्ता : वृत्तसंस्था 

आशियाई स्पर्धेत स्क्वॅाशमध्ये भारताने आजच्या दिवासातले पहिले पदक जिंकले. भारताची महिला स्क्वॅाशपटू दीपिका पल्लिकलने कास्य पदक जिंकत स्क्वॅाशमध्ये भारताने खातं उघडलं. स्क्वॅाशमधलं भारताचं हे पहिलं पदकं ठरलं आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत तिला अव्वल मानांकित निकोल डेव्हीडकडून पराभव पत्करावा लागला.

[amazon_link asins=’B00W6ZUMW8,B00IN3WZYA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’55b44603-a85e-11e8-9265-29ecce5aa44b’]

महिला स्क्वॅाश एकेरी प्रकारात भारताची दीपिका पल्लिकल व जोशना चिनप्पा या सेमीफायनलमध्ये पोहचल्या होत्या त्यामुळे भारताची दोन पदके निश्चित झाली होती. दोघीही सेमीफायनलमध्ये पोहचल्याने भारताच्या सुवर्ण किंवा रौप्य पदकाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण, दीपिका आपला सामना ३-० असा हारल्याने कास्य पदकावर समाधान मानावे लागले. जोशना चिनप्पाकडून महिला स्क्वॅाश एकेरी सुवर्ण किंवा रौप्य पदक जिंकण्याची अपेक्षा आहे. भारताची महिला स्क्वॅाशपटू दीपिका पल्लिकलने कास्य पदक जिंकत भारताची पदकसंख्या २६ वर नेली.

मोदींनी सुध्दा या खेळाडूचे ट्वीट करुन कौतुक केले….