टेबल टेनिसमध्ये  अचंथा-मनिकाला कांस्यपदक

जकार्ता :  वृत्तसंस्था 

जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भारताच्या अचंथा शरथ कमल आणि मनिका बत्रा या जोडीने मिश्र दुहेरीत कांस्यपदक मिळवले. सेमीफायनलमध्ये या जोडीला चीनच्या वांग सुन आणि यिंगशा सुन या जोडीकडून पराभव स्विकारावा  लागला . टेबल टेनिसमध्ये हे दुसरे पदक असून यापूर्वी पुरुष संघाने कांस्यपदक मिळवले आहे.

[amazon_link asins=’B00ID6OY4Q,B06VW1SY2M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b28c68eb-ac1f-11e8-b72a-1136bab23e99′]

 संपूर्ण दिवसात मनिका व अचंथा यांना चार सामने खेळावे लागले. त्यापैकी मलेशियाविरुद्धच भारताने सहज विजय मिळवला. उपांत्य फेरीत चीनच्या यिंगशा सुन व वँग सुन यांच्या विरुद्ध सुद्धा भारतीय जोडीने चांगला प्रतिकार केला. मात्र त्यांना ९-११, ५-११, १३-११, ४-११, ८-११ अशा गुणांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

 तब्ब्ल  ६० वर्षांनी भारताला टेबल टेनिसमध्ये पदक मिळाले आहे . भारताची मिश्र दुहेरी जोडी मनिका बत्रा व अचंथा शरथ कमल यांना उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला असला, तरी त्यांनी ऐतिहासिक कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.

जाहीरात