एक्स्प्लोर

DC vs RR IPL 2021 Match Preview: आज मुंबईत राजस्थान विरुद्ध दिल्ली भिडणार, युवा यष्टीरक्षक कर्णधारांमधील लढाई

DC vs RR IPL 2021 Match Preview:आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना रंगणार आहे. दोन युवा यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज असलेल्या कर्णधारांमध्ये वानखेडेवर ही रंगतदार लढत असणार आहे.

DC vs RR IPL 2021 Match Preview: आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना रंगणार आहे. दोन युवा यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज असलेल्या कर्णधारांमध्ये वानखेडेवर ही रंगतदार लढत असणार आहे. विशेष म्हणजे दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत आणि राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन या दोघांकडेही आयपीएलमध्ये पहिल्यांदाच नेतृत्व आलं आहे.  त्यामुळे सामना जिंकण्यासाठी दोघांचा प्रयत्न असणार आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळला जाणार आहे. 

दिल्लीने पहिल्या सामन्यात धमाकेदार कामगिरी करत अनुभवी महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईला हरवलं आहे. तर दुसरीकडे पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मात्र पंजाब विरुद्ध निसटता पराभव झाला. मात्र या सामन्यात संजू सॅमसनच्या आक्रमक शतकी खेळीमुळं राजस्थानचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला आहे.  

IPL 2021 : बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीच्या अडचणींमध्ये वाढ; कारवाई होणार?

राजस्थान रॉयल्सला जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त असल्याने पहिल्या सामन्यात फटका बसला होता. त्यानंतर आता ऑलराऊंडर बेन स्टोक्स देखील दुखापतीमुळं आयपीएलमधून बाहेर गेला आहे. त्यामुळे डेविड मिलर किंवा लियम लिविंगस्टोनला संधी मिळण्याची शक्यता आहे. राजस्थानकडून संजू सॅमसनसह, मनन वोहरा, जोस बटलर, लियम लिविंगस्टोन, शिवम दुबेकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे.

दुसरीकडे दिल्लीने ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे दिल्ली संघात बदल होण्याची शक्यता कमीच आहे. दिल्लीकडून सलामीवीक शिखर धवन आणि पृथ्वी शॉ जबरदस्त फार्मात आहेत. सोबतच  ऋषभ पंत, अजिंक्य रहाणे, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमेयर यांच्या खेळीकडे देखील लक्ष असणार आहे. 

असे असतील संभाव्य संघ

राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कर्णधार), मनन वोहरा, जोस बटलर, लियम लिविंगस्टोन, शिवम दुबे, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाल, चेतन सकारिया, मुस्ताफिजुर रहमान

दिल्ली कॅपिटल्स: ऋषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमेयर, ख्रिस वॉक्स, आर. अश्विन, आवेश खान, टॉम करन, अमित मिश्रा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2024 : रायडूची विराट कोहलीवर टीका, पीटरसनने उडवली खिल्ली, म्हणाला जोकर 
IPL 2024 : रायडूची विराट कोहलीवर टीका, पीटरसनने उडवली खिल्ली, म्हणाला जोकर 
शेकडो इलेक्ट्रिक पोल कोसळले, पोलिस स्टेशनवरचे पत्रे उडाले; वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान
शेकडो इलेक्ट्रिक पोल कोसळले, पोलिस स्टेशनवरचे पत्रे उडाले; वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान
Watch : हार्दिक पांड्याला नताशा धोका देत होती? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चेला उधाण
Watch : हार्दिक पांड्याला नताशा धोका देत होती? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चेला उधाण
नेरळ-माथेरान टॉय ट्रेनचं रुपडं पालटणार, वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा वैभवशाली इतिहास जिवंत होणार
नेरळ-माथेरान टॉय ट्रेनचं रुपडं पालटणार, वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा वैभवशाली इतिहास जिवंत होणार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour : 2004 च्या मुख्यमंत्रीपदावरुन काका-पुतण्या आमनेसामने, अजित पवार काय म्हणाले?Zero Hour Pune Case : आरोपीचं ब्लड सँपल कसं बदललं? ससूनमध्ये घडला धक्कादायक प्रकारZero Hour Full Pune Car Case : दोघांचं निलंबन, तिघांना अटक! पुणे अपघात प्रकरणात काय-काय घडलं?ABP Majha Headlines : 10 PM : 27 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2024 : रायडूची विराट कोहलीवर टीका, पीटरसनने उडवली खिल्ली, म्हणाला जोकर 
IPL 2024 : रायडूची विराट कोहलीवर टीका, पीटरसनने उडवली खिल्ली, म्हणाला जोकर 
शेकडो इलेक्ट्रिक पोल कोसळले, पोलिस स्टेशनवरचे पत्रे उडाले; वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान
शेकडो इलेक्ट्रिक पोल कोसळले, पोलिस स्टेशनवरचे पत्रे उडाले; वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान
Watch : हार्दिक पांड्याला नताशा धोका देत होती? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चेला उधाण
Watch : हार्दिक पांड्याला नताशा धोका देत होती? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चेला उधाण
नेरळ-माथेरान टॉय ट्रेनचं रुपडं पालटणार, वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा वैभवशाली इतिहास जिवंत होणार
नेरळ-माथेरान टॉय ट्रेनचं रुपडं पालटणार, वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा वैभवशाली इतिहास जिवंत होणार
मैत्रिणीसाठी लावली जीवाची बाजी;  नांदेड जिल्ह्यात तीन युवतींचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा
मैत्रिणीसाठी लावली जीवाची बाजी; नांदेड जिल्ह्यात तीन युवतींचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा
'घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते', हायकोर्टानं सिडकोला खडसावलं 
'घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते', हायकोर्टानं सिडकोला खडसावलं 
T20 World Cup 2024 :  पाच खेळाडू चालले, तर टीम इंडिया जिंकणार टी20 विश्वचषक
T20 World Cup 2024 : पाच खेळाडू चालले, तर टीम इंडिया जिंकणार टी20 विश्वचषक
Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP Majha
Jay Shah at Kolhapur : बीसीसीआयचे सचिव जय शाह कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला ABP Majha
Embed widget