एक्स्प्लोर

Maharashtra Grocery Shop Timings: किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 अशी चार तासच सुरु ठेवण्याचा विचार, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

दुर्गम भागातील जिल्ह्यात जेथील कलेक्टरचा संबंध रोज मंत्रालयाशी होत नाही. तिथे पालक सचिवांनी अधिक अॅक्टिव्हली काम केलं पाहिजे. त्यांनी आपापल्या जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण ठेवावं, अशीही चर्चा झाली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

मुंबई : राज्यात कडक निर्बंध लागू केले असताना कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच किराणा दुकानांची वेळ सकाळी 7 ते 11 करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री यांनी दिली आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो असंही राजेश टोपे यांनी म्हटलं. निर्बंध अधिक कडक करण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. ब्रेक द चेन साधायचे असेल तर यापुढे गरज पडेल तसं आणखी गोष्टी कडक केल्या जातील, असं त्यांनी म्हटलं. 

येत्या 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये आणखी कडक निर्बंध केले पाहिजेत. राज्यात कडक निर्बंध लागू केलेले असतानाही अनेक लोक  विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरणाताना दिसत आहेत. त्यांना आळा घालण्यात यासाठी किराणा दुकाने 7 ते 11 या दरम्यान सुरु ठेवण्याबाबतची चर्चा झाली आहे. जिल्हास्तरावर याबाबत निर्णय घेतले जावे याबाबतही चर्चा झाली, असं राजेश टोपे यांनी म्हटलं. दुर्गम भागातील जिल्ह्यात जेथील कलेक्टरचा संबंध रोज मंत्रालयाशी होत नाही. तिथे पालक सचिवांनी अधिक अॅक्टिव्हली काम केलं पाहिजे. त्यांनी आपापल्या जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण ठेवावं, अशीही चर्चा झाली. 

Coronavirus Lockdown | लॉकडाऊनच्या शक्यतेनं स्थलांतरितांचं पलायन; देशव्यापी लॉकडाऊन नाही, अर्थमंत्र्यांचं आश्वासक वक्तव्य

राज्यात ऑक्सिजनची मोठी मागणी आहे. सध्या 1550 टन ऑक्सीजन दररोज मिळतोय. केंद्र सरकारने 1800 टनापर्यंत जाऊ शकतो असं सांगितलं. मात्र पुढे आणखी ऑक्सिजन मिळाला नाही तर अडचण होईल. राज्याबाहेरुन भिलाई, बिल्लारी आणि विशापट्टणम येथून काही प्रमाणात ऑक्सिजन आणतोय. कोरोना रुग्णांची संख्या  झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचे युनिट बसवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने घ्यावा, असं राजेश टोपे यांनी म्हटलं. 

Delhi Curfew News | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं दिल्लीत आठवड्याभराचा कडक लॉकडाऊन

रेमडेसिवीरच्या कंपन्यांना जादा प्लान्ट उभारण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. ऑक्सिजन कॉन्सट्रेशन मशीन त्वरीत घेण्याच्या सूचना केल्या आहेत. कारण ऑक्सिजनची गरज वाढतेय तेवढे सिलेंडर खाजगी हॉस्पिटल्सकडे नाहीत. इंडस्ट्रीचे ऑक्सिजन सिलेंडर खाजगी रुग्णालयांना उपलब्ध करून दिले पाहिजेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gajanan Kirtikar: गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्याने महायुतीमधला वाद चिघळला, लोकसभेच्या निकालापूर्वी गजाभाऊंची पक्षातून हकालपट्टी?
गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्याने महायुतीमधला वाद चिघळला, लोकसभेच्या निकालापूर्वी गजाभाऊंची पक्षातून हकालपट्टी?
Pune Accident : एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला, प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना
Pune Accident : एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला, प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना
Premachi Goshta Serial Update : अखेर सागर मुक्ताला सत्य सांगणार, आदित्यला काय शिक्षा होणार?
अखेर सागर मुक्ताला सत्य सांगणार, आदित्यला काय शिक्षा होणार?
Most Viewed Movies Web Series : 'हीरामंडी' ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो'; 'या' चित्रपटांचा आणि वेबसीरिजचा ओटीटीवर जलवा; लाखो लोकांनी पाहिलेत
'हीरामंडी' ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो'; 'या' चित्रपटांचा आणि वेबसीरिजचा ओटीटीवर जलवा; लाखो लोकांनी पाहिलेत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

MLC Election 2024 : विधान परिषदेच्या 4 जागांसाठी आज महायुतीत खलबतं ABP MajhaDharavi Fire : धारावीत भीषण आग, 6 जण जखमी; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळीPune Car Accident : पुणे अपघात प्रकरण; ड्रायव्हरला ज्या गाडीतून नेलं ती गाडी जप्त ABP MajhaBuldhana Crime : क्लबमध्ये जिंकलेल्या पैशातून वाद; बुलढाण्यात हॉटेल व्यावसायिकाची हत्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gajanan Kirtikar: गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्याने महायुतीमधला वाद चिघळला, लोकसभेच्या निकालापूर्वी गजाभाऊंची पक्षातून हकालपट्टी?
गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्याने महायुतीमधला वाद चिघळला, लोकसभेच्या निकालापूर्वी गजाभाऊंची पक्षातून हकालपट्टी?
Pune Accident : एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला, प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना
Pune Accident : एक्स बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला भेटायला आला, प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना
Premachi Goshta Serial Update : अखेर सागर मुक्ताला सत्य सांगणार, आदित्यला काय शिक्षा होणार?
अखेर सागर मुक्ताला सत्य सांगणार, आदित्यला काय शिक्षा होणार?
Most Viewed Movies Web Series : 'हीरामंडी' ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो'; 'या' चित्रपटांचा आणि वेबसीरिजचा ओटीटीवर जलवा; लाखो लोकांनी पाहिलेत
'हीरामंडी' ते 'द ग्रेट इंडियन कपिल शो'; 'या' चित्रपटांचा आणि वेबसीरिजचा ओटीटीवर जलवा; लाखो लोकांनी पाहिलेत
RBI: आयसीआयसीआय बँकेला 1 कोटींचा तर येस बँकेला 91 लाखांचा दंड, आरबीआयचा दोन्ही बँकांना दणका, कारण... 
आरबीआयचा आयसीआयसीआय बँक अन् येस बँकेला दणका, दोन्ही बँकांना ठोठावला आर्थिक दंड कारण...
धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलले, तोंडातून चकार शब्दही काढला नाही; अखेर पोलीस खाक्या दाखवताच डॉक्टर घडाघडा बोलायला लागले
धनिकपुत्राचे ब्लड सॅम्पल बदलले, तोंडातून चकार शब्दही काढला नाही; अखेर पोलीस खाक्या दाखवताच डॉक्टर घडाघडा बोलायला लागले
Pune Car Accident: धनिकपुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, 'या' कारणासाठी येरवाडा पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर खायला दिला?
धनिकपुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, 'या' कारणासाठी येरवाडा पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर खायला दिला?
Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
Embed widget