आंबी येथे भरदिवसा पिस्तूलाचा धाक दाखवून पावणे चार लाख लंपास

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

तळेगाव नवलाख उंबरे येथील पेट्रोल पंपावर जमा झालेली तीन लाख ७० हजार रुपये बँकेत भरायला जात असताना पिस्तूलाचा धाक दाखवून रक्कम पळवून नेली. हा प्रकार तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबी येथे सोमवारी सकाळी साडेआकाराच्या सुमारास घडला.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f5b9782f-cac9-11e8-8f02-d564ecfa0ebe’]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवलाख उंबरे येथील पेट्रोल पंपावर जमा झालेली रक्कम कॅशियर आणि एक कर्मचारी रोज बँकेत भरतात. शनिवार, रविवार असल्याने जादा रक्कम जमा झाली होती. नेहमी प्रमाणे कॅशीयर पैसे पंजाब नॅशनल बँकेत भरण्यासाठी दुचाकीवर निघाले होते. आंबी येथे आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी या दोघांना अडवले.

शिक्षकाने कानाखाली मारल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

लुटारूनी स्वतःजवळ असलेल्या पिस्तूलाचा धाक दाखवला. तीन लाख ७० हजार रुपये असणारी बॅग हिसका मारून धूम ठोकली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. ठिक ठिकाणी नाका बंदी करण्यात आली. मात्र लुटारू पैसे घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा पथक शोध घेत आहेत.गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’46db45e8-caca-11e8-a37e-dbbf4c2795b6′]