एक्स्प्लोर

भारतात आतापर्यंत 60 लाख कोविड रुग्ण ठणठणीत बरे; महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनामुक्त

भारतात आतापर्यंत 60 लाख कोविड रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.यात महाराष्ट्र अव्वल स्थानी असून शनिवारी 26 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली.

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गावर अद्याप नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. मात्र, दिलासा देणाऱ्या अनेक गोष्टी घडत आहे. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर घटला असून रिकव्हरी रेट वाढला आहे. महत्वाचं म्हणजे देशात आतापर्यंत 60 लाख कोविड रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सलग 8 दिवसांपासून 1000 पेक्षा कमी मृत्यूची नोंद होत आहे.

बरे झालेले अर्ध्याहून अधिक रुग्ण पाच सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या राज्यातले आहेत. देशाने आज आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला. देशात कोविडमधून बरे झालेल्यांची एकूण संख्या 60 लाखांहून अधिक (60,77,976 ) झाली आहे. दररोज मोठ्या संख्येने कोविड रुग्ण बरे होत असून मोठ्या संख्येने रुग्ण बरे होण्याचा वेग कायम आहे. देशात गेल्या 24 तासात 89, 154 रुग्ण बरे झाले आहेत.

देशभरात वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये झालेली वाढ, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे केंद्राच्या प्रमाणित उपचार प्रोटोकॉलची अंमलबजावणी आणि डॉक्टर, निमवैद्यकीय आणि आघाडीवर काम करणाऱ्यांची समर्पित वृत्ती तसेच वचनबद्धता यामुळे दैनंदिन मृत्यूच्या संख्येत सातत्याने घसरण झालेली पाहायला मिळत आहे. बरे होणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ दिसून येत आहे. गेले सलग आठ दिवस नवीन मृत्यूची नोंद 1000 पेक्षा कमी नोंदवली गेली आहे. देशात गेल्या 24 तासात 918 मृत्यूंची नोंद झाली आहे.

राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट; रिकव्हरी रेट 83 टक्क्यांवर

देशातली सक्रिय (अॅक्टीव) रुग्णांची संख्या 8,67,496 आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतली घट कायम असून गेल्या तीन दिवसात ती 8 लाखांपेक्षा कमी आहे. कोविडमधून रुग्ण बरे होण्याचा (रिकव्हरी रेट) राष्ट्रीय दर आणखी वाढून तो 86.17 % झाला आहे. रुग्ण बरे होण्याच्या वाढत्या संख्येबरोबरच जगात सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे होण्यातले अव्वल स्थान भारताने कायम राखले आहे. बरे झालेल्या रुग्णांपैकी अर्ध्याहून अधिक रुग्ण (54.%), सर्वाधिक रुग्णसंख्या (सक्रिय रुग्णांपैकी 61%) असलेल्या 5 राज्यांमधले आहेत.

महाराष्ट्र अव्वल स्थानी बरे झालेल्या रुग्णांच्या नव्या नोंदींपैकी 80% हे महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि चंदिगड या 10 राज्यांमधले आहेत. यात महाराष्ट्र अव्वल स्थानी असून काल (शनिवार) 26 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली.

मृत्यूदर घटला देशात गेल्या 24 तासात 74,383 नव्या रुग्णांची नोंद झाली. नव्या रुग्णांपैकी 80% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहे. केरळमध्ये सर्वाधिक नवे रुग्ण आढळले असून त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक आहे. या दोन्ही राज्यांमध्ये 11,000 हून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासात 918 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यापैकी 84% मृत्यू हे 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातले आहेत. एकूण मृत्यूंपैकी 33% मृत्यू महाराष्ट्रातले असून काल महाराष्ट्रात 308 मृत्यू झाले. त्यापाठोपाठ कर्नाटकमध्ये 102 मृत्यू झाले.

Maharashtra Unlock | नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार? दिवाळीत महाराष्ट्राला गुडन्यूज?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कृणाल पांड्याच्या घरी गुड न्यूज, पत्नी पंखुडीनं दिला गोंडस बाळाला जन्म
कृणाल पांड्याच्या घरी गुड न्यूज, पत्नी पंखुडीनं दिला गोंडस बाळाला जन्म
Nashik Lok Sabha : शांतीगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
शांतीगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
राहुल द्रविड यांनी पुन्हा जिंकली मनं; पाहा ‘द वॉल’ने नेमकं काय केलं...
राहुल द्रविड यांनी पुन्हा जिंकली मनं; पाहा ‘द वॉल’ने नेमकं काय केलं...
Appi Amchi Collector Marathi Serial : 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम चिमुकला आता छोट्या पडद्यावर;  'झी मराठी'वरील मालिकेत सिंघम स्टाईलने  एन्ट्री
'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम चिमुकला आता छोट्या पडद्यावर; 'झी मराठी'वरील मालिकेत सिंघम स्टाईलने एन्ट्री
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 PM टॉप 25 न्यूज : 26 April 2024 : ABP MajhaWashim Loksabha Election : वाढत्या तापमानाचा परिणाम, वाशिममध्ये दुपारी 3 पर्यंत 42.55 टक्के मतदानABP Majha Headlines : 05 PM : 26 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 26 एप्रिल 2024 एबीपी माझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कृणाल पांड्याच्या घरी गुड न्यूज, पत्नी पंखुडीनं दिला गोंडस बाळाला जन्म
कृणाल पांड्याच्या घरी गुड न्यूज, पत्नी पंखुडीनं दिला गोंडस बाळाला जन्म
Nashik Lok Sabha : शांतीगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
शांतीगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
राहुल द्रविड यांनी पुन्हा जिंकली मनं; पाहा ‘द वॉल’ने नेमकं काय केलं...
राहुल द्रविड यांनी पुन्हा जिंकली मनं; पाहा ‘द वॉल’ने नेमकं काय केलं...
Appi Amchi Collector Marathi Serial : 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम चिमुकला आता छोट्या पडद्यावर;  'झी मराठी'वरील मालिकेत सिंघम स्टाईलने  एन्ट्री
'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम चिमुकला आता छोट्या पडद्यावर; 'झी मराठी'वरील मालिकेत सिंघम स्टाईलने एन्ट्री
PM Modi In Kolhapur : पीएम मोदी उद्या कोल्हापुरात; महापालिकेनं येणारा मार्ग तत्परतेनं चकचकीत झाडून काढला!
पीएम मोदी उद्या कोल्हापुरात; महापालिकेनं येणारा मार्ग तत्परतेनं चकचकीत झाडून काढला!
पुणेकरांचा नादच खुळा... नोकरीचा राजीनामा, बॉसला खुन्नस; ढोला-ताशा वाजवून कंपनीतून धुमधडाक्यात एक्झिट
पुणेकरांचा नादच खुळा... नोकरीचा राजीनामा, बॉसला खुन्नस; ढोला-ताशा वाजवून कंपनीतून धुमधडाक्यात एक्झिट
टी20 वर्ल्डकपमध्ये तीन खेळाडू भारतासाठी गेमचेंजर ठरतील, सिक्सर किंगला विश्वास, विराट-रोहितवरही भाष्य
टी20 वर्ल्डकपमध्ये तीन खेळाडू भारतासाठी गेमचेंजर ठरतील, सिक्सर किंगला विश्वास, विराट-रोहितवरही भाष्य
Yuvraj Singh Shoaib Akhtar :  भाईचा एक फोन, युवराज सिंह-शोएब अख्तर मध्यरात्री धावत आले; दिग्दर्शकाने सांगितला भन्नाट किस्सा
भाईचा एक फोन, युवराज सिंह-शोएब अख्तर मध्यरात्री धावत आले; दिग्दर्शकाने सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget