ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

सिताफळ लागवड करा व मिळवा भरघोस उत्पन्न ! जाणून घ्या; सिताफळ लागवडीची संपूर्ण माहिती…

Plant custard apple and get a good income! Learn; Complete information on custard apple cultivation

सिताफळाची (Custard apple) लागवड प्रामुख्‍याने आंध्रप्रदेश, महाराष्‍ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्‍तरप्रदेश व बिहार राज्‍यात केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये (Maharashtra) बीड, जळगांव, औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सातारा व भंडारा या जिल्‍हयात सिताफळाची झाडे मोठया प्रमाणावर दिसून येतात.

दौलताबाद व पुण्‍याची सिताफळे फारच स्‍वादिष्‍ट लागतात असा शेरा ब-याच चोखंदळ ग्राहकांकडून मिळतो. मराठवाडयातील धारुर व बालाघाट ही गावे सिताफळासाठी प्रसिध्‍द आहेत. विदर्भात पवनी, भंडारा, गोंदिया, वाशिम, माहूर, तर सातारा जिल्‍हयात शिरवळ, कवठे, जवेळे, वाल्‍हे आणि खंडाळा फलटण तालुक्‍यातील काही ठराविक भाग सिताफळाकरिता यशस्‍वी गवडीतून नावारूपाला येऊ लागला आहे.

हेही वाचा :केंद्र सरकार देत आहे, शंभर टक्के अनुदान पाहा: कोणती आहे ही योजना व कुठे कराल अर्ज?

[metaslider id=4085 cssclass=””]

लागवड(Planting)
सिताफळाच्‍या लागवडीसाठी पावसाळयापूर्वी मे महिन्‍यात 0.60 बाय 0.60 बाय 0.60 मीटर आकाराचे खडडे जमिनीचा मगदुर पाहून घ्‍यावेत. 5 बाय 5 मिटर अंतरावर खडडे घ्‍यावेत. 5 बाय 5 मिटर अंतरावर लागवड केल्‍यास हेक्‍टरी 400 झाडे बसतात. हेक्‍टरी खडडे पावसाळयापूर्वी शेणखत, सिंगल सुपर फॉस्‍फेट, पोयटा मातीसह भरावेत. थायमेट 10 जी बांगडी पध्‍दतीने वापरण्‍यात यावे. यासाठी हेक्‍टरी अर्धा टन शेणखत 200 किलो सिंगल सुपर फॉस्‍फेटची आवश्‍यकता आहे. अशा प्रकारे खडडे भरल्‍यानंतर झाडाची लागवड पावसाळयात करावी.

खते(Fertilizers)

सिताफळाच्‍या झाडांना सहसा नियमितपणे खते दिली जात नाहीत. परंतु मोठे फळ व चांगले उत्‍पन्‍न येण्‍यासाठी पावसाळा सुरु झाल्‍याबरोबर प्रत्‍येक झाडाला 2 ते 3 पाटया चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्‍ट खत (Compost manure) देणे योग्‍य ठरते. तसेच पहिल्‍या 3 वर्षापर्यंत प्रत्‍येक झाडांना पुढीलप्रमाणे खते द्यावीत.

हेही वाचा :“ह्या” शोभिवंत फुलाची अशा प्रकारे करा लागवड आणि मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न…

वर्ष नत्र (ग्रॅम) स्‍फूरद (ग्रॅम) पालाश (ग्रॅम)
1 125 125 125
2 250 250 250
3 375 250 250

5 वर्षापुढील प्रत्‍येक झाडाला 5 ते 7 पाटया शेणखत किंवा कंपोस्‍ट खत आणि 200 ते 500 ग्रॅम युरिया द्यावा.

पाणी व्यवस्थापन(Water management)
पावसाच्‍या पाण्‍यावरही चांगले उत्‍पन्‍न येऊ शकते मात्र झाडाला पहिले 3 ते 4 वर्ष उन्‍हाळयात पाणी दिल्‍यास झाडांची वाढ चांगली होते. त्‍याचप्रमाणे फळधारणेनंतर साधारपणे सप्‍टेबर ऑक्‍टोबर महिन्‍यात पाण्‍याच्‍या 1 ते 2 पाळया दिल्‍यास भरपूर व मोठी फळे मिळतात.

आंतरपिके (Intercropping)
सिताफळाचे झाड लहान असेपर्यंत त्‍यात जमिनीच्‍या मगदुरानुसार चवळी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, हरभरा, कलिंगड इत्‍यादी पिके घेता येतात.

हेही वाचा

जून महिन्यात करा बँकेची ‘ही’ महत्त्वाची कामे, अन्यथा सोसावे लागेल आर्थिक नुकसान…

अबब! एकच झाडाला बावीस जातीचे सातशे आंबे, पहा कोणी केली ही किमया, वाचा सविस्तरपणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button