मध्यप्रदेश, झारखंडकडे रवाना होणा-या ३५०० नागरिकांना फुड पॅकेट्स

नवी मुंबई महापालिेकेतर्फे वितरण 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्
  • नवी मुंबई, १५ मे २०२०

 कोव्हीड १९ च्या उपाययोजनांच्या अनुषंगाने जाहीर लॉकडाऊन काळात गरजू मजूर, कामगार, विस्थापित कामगार, बेघर नागरिक, काळजी घेण्यास कोणी नसलेल्या दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक अशा नवी मुंबईकर नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाची काळजी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात येत असून दररोज साधारणत: २४  हजारहून अधिक नागरिकांना १७  कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवण वितरित करण्यात येत आहे. याकामी विविध स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांचेही मौलिक सहकार्य महानगरपालिकेस मिळत आहे.

काल शनिवारी रात्री नवी मुंबईतून मध्यप्रदेशातील रेवा तसेच झारखंडमधील हजारीबागकडे ट्रेनव्दारे रवाना होणा-या ३५०० नागरिकांना भोजन व्यवस्था करून देणेबाबत ठाण्याचे तहसिलदार अधिक पाटील व मंडळ अधिकारी किरण भागवत यांचेमार्फत विनंती करण्यात आली होती.त्यास अनुसरून महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी तातडीने आदेश देत त्या ३५०० प्रवाशांना जेवणाची पॅकेट्स उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

========================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा