पावसाळ्यात डोक्याला येणारी दुर्गंधी कशी दूर करावी?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 11:07 AM2019-07-03T11:07:53+5:302019-07-03T11:15:14+5:30

पावसाळ्यात सतत केस भिजल्याने आणि पाय भिजल्याने वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. या दिवसात सूर्यप्रकाश कमी राहत असल्याने केस लवकर कोरडेही होत नाहीत.

Tips to avoid scalp odour during monsoon | पावसाळ्यात डोक्याला येणारी दुर्गंधी कशी दूर करावी?

पावसाळ्यात डोक्याला येणारी दुर्गंधी कशी दूर करावी?

Next

(Image Credit : TheHealthSite.com)

पावसाळ्यात सतत केस भिजल्याने आणि पाय भिजल्याने वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. या दिवसात सूर्यप्रकाश कमी राहत असल्याने केस लवकर कोरडेही होत नाहीत. अशात केसांची दुर्गंधी येऊ लागते. पावसाळ्याच्या दिवसात डोकं आणि केसांचीदेखील विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. या दिवसांत डोक्याला खाज येते, दुर्गंधी येते. या समस्येला Smelly Hair Syndrome म्हणतात. त्यामुळे हा त्रास होणार्‍यांनी कोणती विशेष काळजी घ्यावी याबद्दल खास टीप्स आम्ही देत आहोत.

काय करावे उपाय?

१) आंघोळ करताना टाळू पाण्याने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्यासोबत योग्य अ‍ॅंन्टी-बॅक्टेरियल किंवा अ‍ॅंन्टीफंगल शॅम्पूचा वापर करावा. याने इंफेक्शन दूर राहण्यास मदत होते. केसांमध्ये मॉईश्चर वाढवणारा शॅम्पू वापरणे टाळा.

(Image Credit : Cleveland Clinic Health Essentials)

२) केसांची काळजी घेण्यासोबतच आहारातही काही बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी फळं आणि भाज्या यांचा आहारात समावेश करावा. महत्त्वाची बाब म्हणजे केस जास्त वेळ भिजलेले राहू देऊ नका.

३) कॅफिनयुक्त पेय टाळा. यात कॉफीचाही समावेश आहे. यामुळे शरीराचे तापमान वाढते. तसेच टाळूवर तेलकटपणा वाढतो. त्यामुळे खाज येण्याचे प्रमाणही वाढते.

(Image Credit : Boldsky.com)

४) कामाशिवाय पावसात बाहेर पडणे टाळा. पावसात भिजल्यानंतर केस माईल्ड क्लिंजरने स्वच्छ धुवावेत. तसेच त्यांना कंडिशनर लावावे.

(Image Credit : Quora)

५) ताण तणाव कमी करा. खूप ताणामुळे घाम येण्याचे प्रमाण वाढते. परिणामी टाळूवर खाज येण्याची समस्यादेखील वाढते.

(Image Credit : Healthline)

६) humidity-protective जेलचा वापर करूनदेखील केसातील अतिरिक्त मॉईश्चर कमी करण्यास मदत होऊ शकते. यामुळे केसांचा चिकटपणा कमी होईल.

Web Title: Tips to avoid scalp odour during monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.