सोळाव्या वर्षीच माझ्यावर बलात्कार झाला :  पद्मा लक्ष्मी

न्यूयॉर्क :  वृत्तसंस्था

सोळा वर्षांची असताना २३ वर्षांच्या बॉयफ्रेंडने आपल्यावर बलात्कार केला होता, अशी खळबळजनक माहिती भारतीय वंशाची अमेरिकी मॉडेल आणि टीव्ही वाहिनीवरील निवेदिका पद्मा लक्ष्मी यांनी दिली आहे. संबधित बॉयफ्रेंडचे नाव त्यांनी जाहीर केलेले नाही. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात निवड करण्यात आलेले ब्रेट कवानॉ यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले जात असून या पार्श्वभूमीवर पद्मा लक्ष्मी यांनी ही माहिती जाहीर केली आहे. पद्मा लक्ष्मी वादग्रस्त लेखक सलमान रश्दी यांच्या विभक्त पत्नी आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’98d98400-c20f-11e8-934b-79bf634d541c’]

न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात त्यांनी ही माहिती दिली आहे. पद्मा लक्ष्मी यांनी या लेखात म्हटले आहे की, अनेक पिढ्यांपासून पुरुष महिलांचे शोषण करीत आहेत आणि त्यांना या बाबत कोणतीही शिक्षा होत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रेट कवानॉ यांची सुप्रीम कोर्टात न्यायाधीशपदी निवड केली आहे. त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप होऊ लागल्यानंतर माझ्या आयुष्यातील कटू घटनांची पुन्हा आठवण झाली. लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या व्यक्तीची निवड ट्रम्प यांनी अति महत्वाच्या महत्वाच्या कामासाठी करणे अयोग्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

बिहारमध्ये काँग्रेस नेत्यांच्या जातींचे ओंगळवाणे प्रदर्शन

माझ्यावर बलात्कार झाल्याचे जाहीर करणे माझ्या हिताचे नसल्यामुळे मी ३२ वर्षे या घटनेची वाच्यता केली नाही. कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या मित्राबरोबर काही दिवसांपासून डेटिंग सुरू होते. त्याने नव्या वर्षांच्या सायंकाळी बलात्कार केला होता. शिवाय सात वर्षांची असताना सावत्र पित्याने लैंगिक शोषण केले होते. ही घटना आईला सांगितल्यानंतर तिने मला भारतातील आजी-आजोबांकडे राहण्यासाठी पाठविले. या घटनेने माझा आत्मविश्वास आणि क्षमतांवर विपरीत परिणाम झाला. अशा घटनांमध्ये पुरुषांचे काहीच नुकसान होत नाही, जे काही नुकसान होते ते स्त्रीचे होते. आता माझी मुलगी आठ वर्षांची आहे. लहान मुलींचे कुणी लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी त्याला विरोध करावा. त्यांनी आरडाओरड करावी. मदत मागावी आणि अशी घटना घडल्याचे कुणाला तरी सांगावे कारण तुमचे शरीर हे फक्त तुमचेच आहे, असेही पद्मा लक्ष्मी यांनी न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6cd40693-c210-11e8-9802-b981fc3ca835′]