विद्युत मोटारीचा शॉक लागून बाप-लेकाचा मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन

विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या आप्पा विठ्ठल ढोबळे (४५) व चैतन्य आप्पा ढोबळे (१५) या बाप-लेकाचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव येथे गुंजेगाव-लक्ष्मी दहिवडी कॅनॉल परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. या बाप-लेकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c8069df4-ba35-11e8-802b-e3821ad89e13′]

याबाबत अधिक माहिती अशी की, उजनी धरणातून कॅनॉलमध्ये पाणी सोडले आहे. आप्पा ढोबळे यांच्या शेतात ऊस लावण्यात आले आहे. या ऊसाला पाणी देण्यासाठी कॅनॉलमधील मोटार चालू करण्यासाठी आप्पा हे गेले होते. त्यावेळी मोटार सुरू करताना त्यांना जोराचा शॉक लागला. चैतन्य वडिलांना वाचविण्यासाठी गेला असता त्यालाही शॉक लागला. त्यांना त्वरीत उपचारासाठी मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जावयाच्या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यु, सासू, पत्नी गंभीर जखमी