अत्याचार झालेल्या ‘त्या’ मुलीच्या गुन्ह्याचा तपास महिला अधिकाऱ्याकडे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

मंदिरात गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर चॉकलेटचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले. यातील अत्यावस्थ असलेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हा तपास वाकड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदारांकडे दिला असल्याचे पोलिसांनी दिलेल्या ‘प्रेस नोट’मध्ये नमूद होते. गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदाराकडे कसा ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावरून पोलिस अधिकारी किती निष्काळजी आहेत हे दिसत आहे. हे वृत्त प्रसिध्द होताच कंट्रोल रूम मधील कमर्चारी आणि अधिकारी यांची झाडाझडती घेऊन यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास महिला सहायक निरीक्षकांकडे असल्याची नवीन ‘प्रेस नोट’ पाठविण्यात आली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7ace5b54-bca5-11e8-9351-1f2a6cf7923e’]

काही दिवसांसाठी थांबलेले वाहनाचे तोडफोड सत्र सुरू
या अत्याचार प्रकरणात गणेश निकम याला अटक केली असून त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बारा वर्षाच्या दोन्ही मैत्रिणी रविवारी दुपारी एका मंदिरात दर्शनाला गेल्या होत्या. दोघांनी या दोन अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवले. चॉकलेट देतो असे सांगून मंदिरा मागील झाडीत नेले. तेथे जबरदस्तीने आणि धमकावून दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान बुधवारी हा प्रकार समोर आला. कोमात असलेल्या मुलीचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गायींना तामिळ आणि संस्कृतमध्ये बोलायला शिकवणार
या गुन्हयाची नोंद हिंजवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र एवढा गंभीर गुन्हा असताना याचा तपास वाकड पोलीस ठाण्याचे हवालदार बी.जी. कण्हेरकर यांच्याकडे असल्याचे नमूद केले होते.

हे वृत्त पोलीसनामा ऑनलाइन मध्ये प्रसिध्द होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंट्रोल रूम मधील कमर्चारी आणि अधिकारी यांची झाडाझडती घेऊन यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास महिला सहायक निरीक्षक सपना देवताळे यांच्याकडे असल्याची नवीन ‘प्रेस नोट’ पाठविण्यात आली. ही कंट्रोल रूम मध्ये टाइपिंग करताना चूक झाली होती, ती निदर्शनस आल्यानंतर त्यात तशी दुरुस्ती करण्यात आली आहे. असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.