मुंबई बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात ओबीसीं प्रवर्गात सर्वाधिक जातींचा समावेश असून या प्रवर्गातील लोकसंख्याही अधिक आहे.ओबीसीं विद्यार्थ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगात (यूपीएससी) आणि इतर स्पर्धा परीक्षेतील टक्केवारी वाढावी, म्हणून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ओबीसी विद्यार्थ्यांनाही बार्टी (BARTI )आणि सारथी (SARTHI ) च्या धर्तीवर सुसज्ज संस्था असावी अशी ‘संभाजी ब्रिगेड, पुणे’ जिल्ह्याच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.
ओबीसींसाठी (OBC) स्वतंत्र संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था स्थापन करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रात शेतीवर अवलंबून असलेल्या गरीब आणि गरजू ओबीसी (OBC) एनटी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संशोधन प्रशिक्षण संस्थेमार्फत मोफत मार्गदर्शन मिळावे महाराष्ट्राच्या धर्तीवर दिल्लीतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा याचा लाभ होईल.
‘सारथी’ संस्थेत मराठा व कुणबी – मराठा जातीचा समावेश आहे. या समाजाचे विद्यार्थी संख्याही जास्त आहे. म्हणून ‘सारथी’ संस्थेच्या धर्तीवर ओबीसींसाठी स्वतंत्र संस्था स्थापन करावी. तसेच या संस्थेसाठी स्वतंत्र प्रशासकीय अधिकारी आणि स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात यावी अशी ,मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
आपल्या लोककल्याणकारी राज्यात स्वतंत्रपणे संस्था स्थापन करून ओबीसींना न्याय द्यावा. याबाबत आम्ही सरकारला यामुळे महत्त्वपूर्ण मागणीसाठी ‘संभाजी ब्रिगेड’चे काही पदाधिकारी कार्यकर्ते सर्वपक्षीय सत्ताधारी व विरोधक नेत्यांना प्रत्यक्ष भेटून सूचित सूचित करत आहोत. ओबीसी (OBC) संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेस राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, राजमाता अहिल्याराणी होळकर, स्वराज्य संघटक मल्हारराव होळकर संस्था यांचे पैकी एक नाव देण्याचीही मागणी करण्यात आली.