एक्स्प्लोर

Anil Deshmukh : राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच धाडींचा वापर, धाडसत्राचा राष्ट्रवादीकडून निषेध

अनिल देशमुख यांच्या घर आणि इतर मालमत्तांवर आज सकाळी सीबीआयनं छापा टाकला.अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे.

मुंबई : न्यायालयाकडून चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत असल्याचा आरोप करतानाच या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली असे सांगतानाच उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही असेही जयंत पाटील म्हणाले.

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयचा छापा

ॲन्टीलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे. 

Anil Deshmukh : अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयची साडेसहा तास झाडाझडती, महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती 

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनिल देशमुख यांच्या घर आणि इतर मालमत्तांवर आज सकाळी सीबीआयनं छापा टाकला. जवळपास साडे सहा तास अनिल देशमुख यांच्या वरळी येथील निवासस्थानाची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती केली. यानंतर सीबीआयची टीम सुखदा निवासस्थान येथून बाहेर पडली आहे. 12 अधिकाऱ्यांची टीम आज सकाळी साडेसातच्या सुमारास अनिल देशमुख यांच्या सुखदा निवासस्थानी पोहोचली होती. सुखदा निवासस्थानासोबतच इतर 9 ठिकाणी देखील सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी छापेमारी सुरू केली आहे. यामध्ये काही महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah on Lok Sabha Elections :
"महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा जिंकू, देशातही NDA ला बहुमत"
Panchayat 3 : काऊंटडाऊन सुरू, अवघ्या काही तासांची प्रतीक्षा; फुलेरा गावचा तंटा सोडवण्यासाठी सचिवजी सज्ज!
काऊंटडाऊन सुरू, अवघ्या काही तासांची प्रतीक्षा; फुलेरा गावचा तंटा सोडवण्यासाठी सचिवजी सज्ज!
Horror Comedy Movie OTT : स्मशानात रिलीज झालेला हॉरर कॉमेडीपटाचा टीझर,ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय चित्रपट
स्मशानात रिलीज झालेला हॉरर कॉमेडीपटाचा टीझर,ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय चित्रपट
Vidhan Parishad Election 2024: कोकण पदवीधरमधून मनसेचे अभिजीत पानसे महायुतीचे उमेदवार? निरंजन डावखरेंचा पत्ता कट?
कोकण पदवीधरमधून मनसेचे अभिजीत पानसे महायुतीचे उमेदवार? निरंजन डावखरेंचा पत्ता कट?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 9  AM : 27  May 2024 : Maharashtra NewsPune Car Accident Case : ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससूनचे दोन डॉक्टर निलंबितTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 27 May 2024 : ABP MajhaAbhijit Panse MNS : कोकणातून अभिजीन पानसे मनसेकडून पदवीधरसाठी मैदानात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah on Lok Sabha Elections :
"महाराष्ट्रात 45 पेक्षा अधिक जागा जिंकू, देशातही NDA ला बहुमत"
Panchayat 3 : काऊंटडाऊन सुरू, अवघ्या काही तासांची प्रतीक्षा; फुलेरा गावचा तंटा सोडवण्यासाठी सचिवजी सज्ज!
काऊंटडाऊन सुरू, अवघ्या काही तासांची प्रतीक्षा; फुलेरा गावचा तंटा सोडवण्यासाठी सचिवजी सज्ज!
Horror Comedy Movie OTT : स्मशानात रिलीज झालेला हॉरर कॉमेडीपटाचा टीझर,ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय चित्रपट
स्मशानात रिलीज झालेला हॉरर कॉमेडीपटाचा टीझर,ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय चित्रपट
Vidhan Parishad Election 2024: कोकण पदवीधरमधून मनसेचे अभिजीत पानसे महायुतीचे उमेदवार? निरंजन डावखरेंचा पत्ता कट?
कोकण पदवीधरमधून मनसेचे अभिजीत पानसे महायुतीचे उमेदवार? निरंजन डावखरेंचा पत्ता कट?
Pune Accident News: ससूनमध्ये धनिकपुत्राच्या नातेवाईकाने पैसे फेकले, डॉक्टरांकडून ब्लड सॅम्पलची अदलाबदल, वाचा नेमकं काय घडलं?
ससूनमध्ये धनिकपुत्राच्या नातेवाईकाने पैसे फेकले, डॉक्टरांकडून ब्लड सॅम्पलची अदलाबदल, वाचा नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! मालेगावात माजी महापौरावर गोळीबार, तीन गोळ्या झाडल्या, हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी 
मोठी बातमी! मालेगावात माजी महापौरावर गोळीबार, तीन गोळ्या झाडल्या, हल्ल्यात अब्दुल मलिक गंभीर जखमी 
OTT Release This Week : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; बहुप्रतिक्षीत 'पंचायत 3' अन् बरचं काही...
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; बहुप्रतिक्षीत 'पंचायत 3' अन् बरचं काही...
Shreyas Iyer : केकेआरनं ट्रॉफी जिंकली, श्रेयसच्या एका कृतीवर चाहते खूश, आयपीएल विजेत्या कॅप्टननं काय केलं? Video
Shreyas Iyer : कॅप्टन कसा असावा श्रेयसनं दाखवलं, आयपीएल ट्रॉफीचा पहिला मान रिंकू सिंगला, पाहा व्हिडीओ
Embed widget