ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
यशोगाथा
ट्रेंडिंग

शेतकऱ्याच्या मुलाने बनविल्या ४०० हून स्वयंचलित मशीन; १५ राज्यात पाठवून केली तब्बल २० लाखांची उलाढाल..

मराठवाड्यातील अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असणाऱ्या शेतकऱ्याच्या (farmers) मुलाने स्वयंचलित फवारणी यंत्राचा शोध लावला आहे. या तरुणाचे नाव योगेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील चित्ते पिंपळगाव येथे योगेश राहतो. या युवकाने मागच्या ४ वर्षात ४०० हून अधिक मशीन बनवल्या व १५ राज्यात त्या पाठवल्या व तब्बल २० लाखांची उलाढाल केली.

वाचा – या गोष्टींसाठी देण्यात येणार निधी ; राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

योगेशने निओ स्प्रे पंप (Neo spray pump) सर्वात पहिल्यांदा महाविद्यालयातील एका प्रोजेक्टसाठी हे यंत्र बनविले होते. आणि या यंत्राची प्रचंड मागणी होत आहे. विशेष म्हणजे वेळेची बचत व विष बाधेचा धोका नाही. या यंत्रासाठी फक्त ३ हजार ८०० रुपये खर्च आला होता. याचाच उद्योग बनवायचा ठरवला व ४ वर्षात ४०० स्वयंचलित फवारणी यंत्र बनवले व यामधून तब्बल २० लाखांची उलाढाल केली.

वाचा – शेतकऱ्यांवर येणार आता आर्थिक भार; ज्याचा माल त्याचीच हमाली केली बंधनकारक…

स्वयंचलित यंत्राच्या माध्यमातून अशी होते फवारणी –

या फवारणी यंत्राला निओ स्प्रे पंप (Neo spray pump) असे नाव दिले आहे. वाहनाला चेन आहे त्यामुळे दोन्ही चाके फिरतात. यामध्ये उलटी प्रक्रिया आहे. चाकाच्या एका लोखंडी स्टँड वर खताची पिशवी लटकवता येते. यंत्र सुरू झाले की यंत्राची दांडा खाली वर करण्याची प्रक्रिया सुरू होते. व नोझल मधून फवारणी केली जाते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button