एक्स्प्लोर

Sangli Unlock : सांगली जिल्हा तिसऱ्या स्तरात, निर्बंधात शिथिलता; काय सुरु, काय बंद?

कोविड पॉझिटिव्हिटी रेटनुसार सांगली जिल्हा तिसऱ्या स्तरात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपासून निर्बंध काहीशी शिथिल झाले आहेत. 14 जून 2021 रोजी सकाळी 5 वाजल्यापासून 21 जून 2021 सकाळी 5 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील.

सांगली : कोविड पॉझिटिव्हिटी रेटनुसार सांगली जिल्हा तिसऱ्या स्तरात गेला आहे. त्यामुळे आजपासून जिल्ह्यात निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता देण्यात येत आहे. सांगली जिल्ह्याचा मागील आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट 11 टक्के इतका होता. आठवडाभरात पॉझिटिव्हिटी दरात घट झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आजचा पॉझिटिव्हिटी रेट 7.86 टक्के आहे. 14 जून 2021 रोजी सकाळी 5 वाजल्यापासून 21 जून 2021 सकाळी 5 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील.

कोविड पॉझिटिव्हिटी रेट आणि व्यस्त ऑक्सिजन बेड टक्केवारीनुसार राज्यातील जिल्ह्यांना 1 ते 5 स्तर (Level) मध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. 10 जून 2021 रोजी संपणाऱ्या आठवड्याचा सांगली जिल्ह्यातील कोविड पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा जास्त पण 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि व्यस्त ऑक्सिजन बेड टक्केवारी 25 टक्क्यापेक्षा जास्त पण 40 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्याचा स्तर 3 (level 3) मध्ये आल्याने, या स्तराचे निर्बंध सांगली जिल्ह्यात लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत. 

नव्या निर्बंधांनुसार सांगली जिल्ह्यात कोणकोणत्या गोष्टींना सूट?

- अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट नसणारी सर्व दुकाने (सर्व बाजारपेठ, कापडपेठ, सराफपेठ) सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. 

- सर्व किराणा, भाजीपाला दुकान, फळ विक्रेते, दूध व दुग्धजन्य पदार्थ, डेअरी, बेकरी, मिठाई, पेट शॉप्स व सर्व प्रकारची खाद्य दुकाने (मटन, चिकन, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांसह) सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. 

- जिल्ह्यातील सर्व अधिकृत भाजीमंड्या सकाळी 7 ते सायंकाळी 4 सुरु राहतील. जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील सर्व आठवडा बाजार मात्र बंद राहतील. 

- कृषी उत्पन्न बाजार समिती, फळ मार्केटमधील सर्व व्यवहार सकाळी 7 ते सायंकाळी 4  वाजेपर्यंत सुरु राहतील. 

- बियाणे, खते, शेतीविषयक उपकरणे व त्यांची दुरुस्तीची सेवा देणाऱ्या, तसेच पशुखाद्य दुकाने यांच्या आस्थापना सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील.

काय सुरु?

- सर्व दुकानांना सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत परवानगी

- जिल्ह्यात चित्रपट, मालिका चित्रीकरणाला परवानगी

- 50 टक्के क्षमतेने व्यवसाय करण्यास हॉटेल, रेस्टॉरंट, बारचालकांना परवानगी

- शासकीय,खासगी वाहतूक अत्यावश्यक सेवेतील सर्व व्यवहार नियमित सुरू राहणार

- सलून, जिम सुरु राहणार, क्रीडांगणे, मॉर्निंग वॉकसाठी सकाळी 9 पर्यंत परवानगी

- पूर्ववत राज्याबाहेरील परीक्षांना परवानगी

काय बंद?

- अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने शनिवार, रविवारी बंद

- शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस बंद धार्मिक स्थळे, सिनेमागृहे, मॉल, जलतरण तणाव, सभागृह बंदच 

- भाजी मंडई वगळता सर्व आठवडा बाजारही बंदच राहणार

सांगलीत कोरोनाचे 8951 सक्रिय रुग्ण
सांगली जिल्ह्यात आजतागायत एकूण कोरोनाबाधितांची रुग्णांची संख्या 1 लाख 30 हजार 201 एवढी आहे. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजार 951 इतकी आहे. तर आतापर्यंत एकूण 3 हजार 738 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Fact Check : मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असे विधान केले होते का? सत्य जाणून घ्या
मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असं म्हटलं होतं का? सत्य काय?
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Lokesh Sharma : पेनड्राईव्ह दाखवत लोकेश शर्मा यांचे गेहलोतांवर गंभीर आरोपAjit Pawar speech Daund : राहुल कुल यांच्या मैदानात अजित पवार यांची बॅटिंगHello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणंLok Sabha 2024 : महायुतीच्या उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज, महायुतीचं जोरदार शक्तिप्रदर्शन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
T20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा संघ लीक झाला; तीन धक्कादायक नावे समोर आली!
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
ग्लेन मॅक्सवेल आजही बाहेरच, आरसीबीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Fact Check : मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असे विधान केले होते का? सत्य जाणून घ्या
मनमोहन सिंग यांनी 'देशाच्या साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क' असं म्हटलं होतं का? सत्य काय?
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
रक्षा खडसे, स्मिता वाघ यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज; जळगावात महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन
Vidya Balan : मी धार्मिक आहे पण कधीही....; देशातील धार्मिक ध्रुवीकरणावर विद्या बालनने काय म्हटले?
मी धार्मिक आहे पण कधीही....; देशातील धार्मिक ध्रुवीकरणावर विद्या बालनने काय म्हटले?
Mallikarjun Kharge on PM Modi : भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जु खरगेंकडून खोचक शब्दात पीएम मोदींना पत्र
भाषणे पाहून आश्चर्य वाटलं नाही, जातीय तेढ निर्माण करणे तुमची सवय; मल्लिकार्जुन खरगेंचं खोचक शब्दात मोदींना पत्र
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
Embed widget