एक्स्प्लोर

55 वर्षीय प्रियकराचा 58 वर्षीय प्रेयसीवर प्राणघातक हल्ला, तोंडात सुतळी बाम्ब फोडून स्वत:ही जखमी

मुंबईत एका 55 वर्षीय प्रियकराने आपल्या 58 प्रेयसीच्या घरात घुसून तिच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. यानंतर स्वत:च्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडून घेतला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई : मुंबईत एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 55 वर्षीय प्रियकराने आपल्या 58 प्रेयसीच्या घरात घुसून तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. एवढंच नाही तर महिला जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळल्यानंतर आरोपीने क्रूरपणे तिचे केस कापले. त्यानंतर सोबत आणलेला सुतळी बॉम्ब स्वत:च्या तोंडात फोडून घेतला. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ही धक्कादायक घटना मुंबईतील मालाडमधली कुरार विलेज येथील पुष्पा पार्कमध्ये घडली आहे. इथल्या इमारतीमधील एक 58 वर्षीय घटस्फोटीत महिला तिच्या 80 वर्षीय आई, दोन मुली आणि एका मुलासोबत राहते. या महिलेचे 55 वर्षीय वाहन चालक सचिन चौहान यांच्याशी प्रेमसंबंध होते. जवळपास 15 वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध असल्याने आरोपी सचिन चौहानचे महिलेच्या घरी येणे जाणे होते.

याच दरम्यान 1 नोव्हेंबरला सचिन चौहान प्रेयसीला भेटाण्यासाठी तिच्या घरी गेला होता. परंतु तिच्या आईने सचिनला घरात घेण्यास नकार दिला. यावरुन सचिनसोबत त्या महिलेचे आणि तिझ्या आईचे कडाक्याचे भांडण झाले. नंतर 15 नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी सात वाजता ही महिला कामावर जाण्यासाठी निघताच सचिन चौहानने घरात प्रवेश केला. काही कारणाने पुन्हा सचिन आणि त्या महिलेमध्ये कडाक्याचे भांडण झाले. भांडण सुरु असतानाच सचिन चौहानने आपल्यासोबत आणलेल्या चाकूने प्रेयसीच्या गळ्यावर, चेहऱ्यावर आणि अंगावर सपासप वार केले. एवढंच नाही तर क्रूरपणे महिलेचे केस देखील चाकूने कापले. यानंतर सोबत आणलेला सुतळी बॉम्ब स्वत:च्या तोंडात फोडून घेतला. यात दोघेही गंभीर जखमी झाले असून दोघांवर कुपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. सध्या आरोपीविरोधात आयपीसीच्या विविध कलामांखाली गुन्हा दाखल करुन पुढील तपास केला जात आहे, अशी माहिती कुरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांनी दिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गौतम गंभीर-चंदू पंडितचा डाव, श्रेयस अय्यरचं नेतृत्व, कोलकात्याच्या विजयाची 5 कारणं
गौतम गंभीर-चंदू पंडितचा डाव, श्रेयस अय्यरचं नेतृत्व, कोलकात्याच्या विजयाची 5 कारणं
KKR vs SRH : स्वप्न भंगलं, हैदराबादच्या पराभवाची ही आहेत 5 कारणं, फायनलमध्ये पॅट कमिन्स कुठं चुकला? 
KKR vs SRH : स्वप्न भंगलं, हैदराबादच्या पराभवाची ही आहेत 5 कारणं, फायनलमध्ये पॅट कमिन्स कुठं चुकला? 
IPL 2024 : सनरायजर्स हैदराबादच्या हातून मॅच कधी निसटली, केकेआरच्या विजयाचा टर्निंग पॉईंट नेमका कोणता? पाहा व्हिडीओ
IPL 2024 : सनरायजर्स हैदराबादच्या हातून मॅच कधी निसटली, केकेआरच्या विजयाचा टर्निंग पॉईंट नेमका कोणता?
jalgaon : उष्णतेच्या लाटेने मयत झालेल्या वीस लोकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार; जळगावातील जीएम फाऊंडेशनचा पुढाकार
उष्णतेच्या लाटेने मयत झालेल्या वीस लोकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार; जळगावातील जीएम फाऊंडेशनचा पुढाकार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Rohit Pawar Tanaji Sawant : खेकड्याची संस्कृती आरोग्य विभागाला संपवून टाकेल,शिंदेंनी सर्जरी करावीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 11 PM : 26 May 2024Sushma Andhare Eknath Shinde : कुटुंबाची जबाबदारी कळली नाही, राज्याची जबाबदारी कशी सांभाळतील?ABP Majha Headlines : 11 PM : 26 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गौतम गंभीर-चंदू पंडितचा डाव, श्रेयस अय्यरचं नेतृत्व, कोलकात्याच्या विजयाची 5 कारणं
गौतम गंभीर-चंदू पंडितचा डाव, श्रेयस अय्यरचं नेतृत्व, कोलकात्याच्या विजयाची 5 कारणं
KKR vs SRH : स्वप्न भंगलं, हैदराबादच्या पराभवाची ही आहेत 5 कारणं, फायनलमध्ये पॅट कमिन्स कुठं चुकला? 
KKR vs SRH : स्वप्न भंगलं, हैदराबादच्या पराभवाची ही आहेत 5 कारणं, फायनलमध्ये पॅट कमिन्स कुठं चुकला? 
IPL 2024 : सनरायजर्स हैदराबादच्या हातून मॅच कधी निसटली, केकेआरच्या विजयाचा टर्निंग पॉईंट नेमका कोणता? पाहा व्हिडीओ
IPL 2024 : सनरायजर्स हैदराबादच्या हातून मॅच कधी निसटली, केकेआरच्या विजयाचा टर्निंग पॉईंट नेमका कोणता?
jalgaon : उष्णतेच्या लाटेने मयत झालेल्या वीस लोकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार; जळगावातील जीएम फाऊंडेशनचा पुढाकार
उष्णतेच्या लाटेने मयत झालेल्या वीस लोकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार; जळगावातील जीएम फाऊंडेशनचा पुढाकार
श्रेयस अय्यरला टीम इंडियातून वगळलं, T20 world cup मध्ये स्थान नाही, आता KKR ला एकतर्फी IPL चषक जिंकून दिला
श्रेयस अय्यरला टीम इंडियातून वगळलं, T20 world cup मध्ये स्थान नाही, आता KKR ला एकतर्फी IPL चषक जिंकून दिला
हेड-अभिषेक शर्मानं आयपीएल गाजवलं, पण मेन मॅचला पचकले, हैदराबादचा लाजीरवाणा पराभव
हेड-अभिषेक शर्मानं आयपीएल गाजवलं, पण मेन मॅचला पचकले, हैदराबादचा लाजीरवाणा पराभव
पंतप्रधान मोदींमुळे सुजय विखे निवडून येणार पण, मताधिक्य मात्र...; भाजपच्या राम शिंदेंनी केला दावा
पंतप्रधान मोदींमुळे सुजय विखे निवडून येणार पण, मताधिक्य मात्र...; भाजपच्या राम शिंदेंनी केला दावा
Nashik Accident : ब्रेक फेल झाल्याने एसटीची टँकरला जोरदार धडक, 20 हून अधिक प्रवासी जखमी; नाशिकच्या पिंपळगाव टोलजवळील घटना
ब्रेक फेल झाल्याने एसटीची टँकरला जोरदार धडक, 20 हून अधिक प्रवासी जखमी; नाशिकच्या पिंपळगाव टोलजवळील घटना
Embed widget