मी E-शेतकरी

Trees Tips | झाडांवरील कीड, रोग नष्ट करा कायमची; त्वरित करा घरगुती हा उपाय…

Trees Tips | झाडांवरील कीड, रोग नष्ट करा कायमची; त्वरित करा घरगुती हा उपाय…

Trees Tips | आपल्या फळा फुलांच्या बागेतील झाडे फुलविण्यासाठी सोडा उपयोगी पडणार आहे. ब्रेकिंग (breking) सोडा झाडांवरील कीड, रोग नष्ट करतो व सुंदर बाग फुलवतो. ब्रेकिंग सोड्याचा बागेसाठी कसा फायदा होईल? पाहुया सविस्तर..

वाचा – शेतकऱ्यांसाठी दिलासादायक, नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जाचे व्याज होणार जमा..

ब्रेकिंग सोड्याचा झाडांना उपयोग –

1) फुलं छान येण्यासाठी –

खूप वेळा गुलाब जास्वंद लागवडीनंतर झाडांच्या पानावर किडीचा प्रादुर्भाव दिसतो. छान छान कळ्या आलेल्या कळीला नेमकी कीड लागते व त्याचे फुल होण्यापासून कळी मुकते, व तिथेच गळून जातात. तर अशा केली काय केले पाहिजे? घरगुती उपाय जाणून घेऊया…
फुलांवरचा रोग किंवा कीड घालविण्यासाठी 1 लिटर पाणी घ्या, त्यामध्ये एक ती स्पून ब्रेकिंग (breking) सोडा टाका. व हे द्रावण एका स्प्रे बॉटल मध्ये भरा, कळी येण्यास सुरुवात झालीय हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा हे द्रावण फवारा.

2) रोपट्यावर कीड, रोग घालविण्यासाठी-

बऱ्याच झाडांना पांढरा, भुरकट लागलेली कीड दिसून येते. किंवा एखादा रोग पडून पानांना छिद्र पडून गळत असल्याची दिसून येतात. हा बुरशी रोग घालविण्यासाठी 1 लिटर पाणी त्यात 2 टी स्पून ब्रेकिंग सोडा आणि 1 टी स्पून नीम ऑइल टाका. हे द्रावण स्प्रे बॉटल (spre bottle) मध्ये भरून ठेवा व आठवड्यातून एक – दोन वेळा फवारा.

3) झाडाची पानं स्वच्छ होतात

पानांवरील धूळ काढण्यासाठी ब्रेकिंग (breking) सोड्याचा वापर करता येतो. यासाठी 1 लिटर पाणी घ्या त्यामध्ये अर्धा टी स्पून ब्रेकिंग सोडा टाका. आणि हे द्रावण झाडांवर फवारा.

4) टेरेस गार्डनची स्वच्छता –

कुंड्या, अवजार, बादल्यातसेच आसपासची जागा स्वच्छ करण्यासाठी ब्रेकिंग सोडा उपयुक्त ठरतो. यासाठी 2 टी स्पून ब्रेकिंग सोडा घ्या, 2 टी स्पून लिक्विड सोप 1 लिटर लिटर पाण्यात टाका. हे द्रावण फवारा.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

राज्यात 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याने दिला सावध राहण्याचा इशारा..

ह्या” औषधी वनस्पतीची लागवड करा चांगले पैसे मिळवण्याची संधी..


Posted

in

by