अमरावती- पुणे, मुंबई शहरातील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना अमरावती शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील अल्पवयीन गर्भवती बलात्कार पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे.
अमरावती जिल्ह्यातील येवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात ही घटना घडली आहे. पीडितेवर अत्याचार झाल्यानंतर तिने राहत्या घरात गळफा घेत आपले आयुष्य संपविले आहे.
या प्रकरणी येवदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिडीतेच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पीडितेवर गेल्या नऊ महिन्यांपासून अत्याचार सुरू असल्याची माहिती पुढे आली असून शवविच्छेदन झाल्यानंतर पीडिता सात महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे.
या घटनेबाबत भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार पीडित मुलगी ७महिन्यांची गर्भवती भीतीपोटी पीडितेने गळफास लावून संपवली जीवनयात्रा निशब्द आहे मी अत्याचाराच्या घटना संपतचं नाही येत रोजचं सुरूहे अमरावतीच्या मुलीने जीवन संपवलं तर मुंबईतील महिला मृत्युशी लढतीये सावित्रीच्या लेकींची फरफट कुठपर्यंत.
अमरावतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
पीडित मुलगी ७महिन्यांची गर्भवती
भीतीपोटी पीडितेने गळफास लावून संपवली जीवनयात्रानिशब्द आहे मी
अत्याचाराच्या घटना संपतचं नाहीयेत
रोजचं सुरूहे अमरावतीच्या मुलीने जीवन संपवलं तर मुंबईतील महिला मृत्युशी लढतीयेसावित्रीच्या लेकींची फरफट कुठपर्यंत
— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) September 11, 2021
दरम्यान, राज्यात आज अत्याचारामुळे दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईतील साकिनाका येथे अत्याचार केलेल्या महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे अत्याचार सहन न झाल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील एका तरुणीने आपले आयुष्य संपविले आहे. या दोन घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.