MB NEWS-विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव

 विजेच्या प्रश्नावर सिरसाळा येथील विज वितरणच्या अधिकाऱ्यास माकप चा घेराव



परळी : दि 21 प्रतिनिधी

       सिरसाळा परिसरातील ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने सिरसाळा येथील विजवितरणच्या अभियंत्यास गुरूवारी घेरावा घालण्यात आला.



  विजेचे वाढीव भारनियमन रद्द करण्यात यावे, वीज पुरवठा चोवीस तास सुरळीत करावा, शेतीसाठी बारा तास वीजपुरवठा करण्यात यावा, शेतकरी ग्राहकांना कोटेशन देण्यात यावे, आवश्यक ठिकाणी पोल, तार यांची व्यवस्था करण्यात यावी, वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंतानी मुख्य कार्यालय ठिकाणी मुक्कामी असावा या मागण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने सिरसाळा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर अभियंता अभिजीत राठोड व श्री निंबाळकर यांना घेराव घालून  गुरुवारी(ता.21) आंदोलन केले. गेल्या दोन महिन्यापासून सिरसाळा व परिसरातील गावांमध्ये वीज वितरण कंपनीकडून मोठ्या प्रमाणात भारनियमन होत असल्याने नागरिक ऐन उन्हाळ्यात त्रस्त झाले आहेत. तसेच शेतीसाठी ही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने पिके करपत आहेत. शेतामध्ये अवघ्या दोन ते तीन तास वीज पुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे कठीण बनले आहे. गावात सध्या वीज वितरण कंपनीकडून सातत्याने विजेची वसूली होताना दिसते. मात्र वितरण कंपनीकडून सुविधाचा खेळखंडोबा दिसून येतो. अनेक वेळा वीज गेल्यानंतर चार- चार तास फ्यूज   टाकण्यास कर्मचारी दुर्लक्ष करतात. तसेच वीज वितरण कंपनीमधील अभियंते, कंत्राटी कर्मचारी मोबाईल स्वीच ऑफ करून ठेवतात असा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. या आंदोलनात माकप चे जिल्हा सचिव कॉ.अजय बुरांडे, तालुका सचिव कॉ. गंगाधर पोटभरे, किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. सुदाम शिंदे, कॉ. भगवान बडे, कॉ अनुरथ गायकवाड, मदन वाघमारे, बाबा शेरकर, आदींचा समावेश होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?