MB NEWS-पाणी मागण्याच्या बहाण्याने आले अन् चाकुने भोसकले;पतीचा मृत्यू पत्नी गंभीर

पाणी मागण्याच्या बहाण्याने आले अन् चाकुने भोसकले;पतीचा मृत्यू पत्नी गंभीर 






केज :- पाणी मागण्याच्या बहाण्याने आलेल्या तिघांनी पती-पत्नीवर चाकूने वार केल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला आहे. 

या बाबतची माहिती अशी की दि. ११ जुलै सोमवार रोजी सायंकाळी सुमारे ७:१५ वा. च्या दरम्यान चिंचोली माळी ता. केज येथील रस्त्यावर घर असलेल्या पांडुरंग राऊत यांच्या घरी तोंडाला स्कार्फ बांधलेले तीन अनोळखी व्यक्ती गेले. त्यांनी त्यांना पिण्यासाठी पाणी मागितले. पत्नी शशिकला राऊत ही पाणी घेऊन येताच त्या तीन अज्ञात चोरट्यानी तिच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेतले. या वेळी शशिकला हिचा पती पांडुरंग राऊत हा विरोध करीत असताना अज्ञाताने त्याला चाकू भोकसला. या झटापटीत त्याची पत्नी शशिकला राऊत ही देखील जखमी झाली आहे. मारेकऱ्यांनी खून करून पळून जाताना कोणाला दिसू नये आणि ओळख पटू नये म्हणून घरातील विजेचा बल्ब काढून अंधार केला. चाकूचा घाव वर्मी बसताच पांडुरंग राऊत याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?