देवेंद्र भाऊ आमचं मविआचे काम उत्तम चाललंय, तुम्ही अ‌ॅडजस्ट करून घेतलं तर अजून उत्तम चालेल: अशोक चव्हाण

देवेंद्र भाऊ आमचं महाआघाडीचे काम उत्तम चाललंय, तुम्ही ऍडजस्ट करून घेतल तर अजून उत्तम चालेय, असा टोला अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

देवेंद्र भाऊ आमचं मविआचे काम उत्तम चाललंय, तुम्ही अ‌ॅडजस्ट करून घेतलं तर अजून उत्तम चालेल: अशोक चव्हाण
अशोक चव्हाण देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 7:18 PM

नांदेड : काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमाला खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी शिंदे आणि श्याम सुंदर शिंदे , भास्करराव पाटील खातगावकर, माजी मंत्री सूर्यंकांता पाटील आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर उपस्थित होते. स्वर्गीय गंगाधरराव देशमुख यांच्या स्मृतिग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले. या कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. देवेंद्र भाऊ आमचं महा विकास आघाडीचे (MVA) काम उत्तम चाललंय, तुम्ही अ‌ॅडजस्ट करून घेतल तर अजून उत्तम चालेय, असा टोला अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

मीडियाचा आज भ्रमनिरास होणार

लोकांच्या कल्पनेला आपण लगाम लावू शकत नाही, एखाद्या व्यक्तीमत्वासाठी आम्ही एकत्र आलोत. एका व्यासपीठावर सगळ्याच पक्षाचे नेते येण्याची पहिली वेळ आहे. मीडियाचा या कार्यक्रमातून भ्रमनिरास होऊ शकतो. पण, फडवणीस जी तुमचं शेवटचं भाषण आहे तर त्यात काय निघेल ते निघेल, असंही अशोक चव्हाण म्हणाले. कोरोनामुळे गंगाधरराव यांचा मृत्यू झाला यावर आमचा विश्वास बसत नाही. मला कोरोना झाला तेव्हा हॉस्पिटलमध्ये जाताना लोक शेवटचा निरोप देतायत की काय अशी स्थिती होती- चव्हा स्वर्गीय गंगाधराव देशमुख यांनी डोळा मारला की काहीतरी गडबड असायची, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी त्यांची आठवण जागवली. कधीकाळी मतभेद झाले पण मनभेद झाले नाहीत, असं चव्हाण अशोच चव्हाण म्हणाले.

देवेंद्र भाऊ महाविकासआघाडीचं काम उत्तम चाललंय

देवेंद्र भाऊ आमचं महाआघाडीचे काम उत्तम चाललंय, तुम्ही अ‌ॅडजस्ट करून घेतल तर अजून उत्तम चालेल, असा टोला अशोक चव्हाण यांनी  लगावला. मेहुण्याने चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस दोघांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्याने त्याला उत्तर देत फडवणीस यांना उद्देश्यून चव्हाण यांनी हे वक्तव्य केले. देवेंद्र फडवणीस माझे शेजारी, भिंतच आडवी, पण मॅच फिक्सिंग होत नाही. शेजारी आहोत, लोकांनी कान भरू नये आम्ही नेहमी बोलत असतो, असंही अशोक चव्हाण म्हणाले.

पाहा व्हिडीओ :

राज्यातील राजकीय युद्ध गँग वार होऊ नये, राजकारणाचा स्तर घसरलाय, तो राखला जावा तर महाराष्ट्र हिताचे काम होईल, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. बुलेट ट्रेन विदर्भात चालली ठीक आहे ती इकडे मराठवाड्यात यावी. समृद्धी महामार्ग नांदेडपासून पुढे हैद्राबाद पर्यंत वाढवा, बुलेट ट्रेन नांदेड मार्ग हैदराबाद पर्यंत न्यायला पाहिजे. आपण दोघांनी प्रयत्न केले तर हे स्वप्न पूर्ण होईल, असंही अशोक चव्हाण देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले. राजकीय परिस्थिती कायम बदलत असते, जे अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये चाललंय तशी आपल्यावर वेळ येऊ नये, आजचा कार्यक्रम म्हणजे राजकीय परिपक्वतेचे उदाहरण, असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.

इतर बातम्या:

अशोकराव, तुम्ही मध्यस्थी करा, मुख्यमंत्र्यांना समजावा, बुलेट ट्रेनचं काम पूर्ण करा, देवेंद्र फडणवीसांची साद

Sujat Ambedkar: ‘आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा’ सुजातचं चॅलेंज ‘राजपुत्र’ स्वीकारणार?

Non Stop LIVE Update
महाराष्ट्रात कोणत्या जागांवर कोण हिरो? कोणाच्या पारड्यात कोणती जागा?
महाराष्ट्रात कोणत्या जागांवर कोण हिरो? कोणाच्या पारड्यात कोणती जागा?.
वडेट्टीवार भाजपात जाणार की शिवसेनेत येणार? शिरसाटांच्या दाव्यान चर्चा
वडेट्टीवार भाजपात जाणार की शिवसेनेत येणार? शिरसाटांच्या दाव्यान चर्चा.
Shirur Exit Poll : शिरूरमध्ये कुणाची हवा? अमोल कोल्हे की आढळराव पाटील?
Shirur Exit Poll : शिरूरमध्ये कुणाची हवा? अमोल कोल्हे की आढळराव पाटील?.
कल्याण कुणाचे? एक्झिट पोलचं दान कुणाच्या पदरात?; श्रीकांत शिंदे की...
कल्याण कुणाचे? एक्झिट पोलचं दान कुणाच्या पदरात?; श्रीकांत शिंदे की....
Baramati Exit Poll 2024 : बारामतीकरांचा कौल कुणाला? नणंद की भावजयला?
Baramati Exit Poll 2024 : बारामतीकरांचा कौल कुणाला? नणंद की भावजयला?.
बाळ्या मामा की कपिल पाटील?; एक्झिट पोलचा भुवया उंचावणारा अंदाज काय?
बाळ्या मामा की कपिल पाटील?; एक्झिट पोलचा भुवया उंचावणारा अंदाज काय?.
Exit Poll 2024 : होमपीचवरच शिंदेंना धक्का? राज्यातील सर्वात मोठी बातमी
Exit Poll 2024 : होमपीचवरच शिंदेंना धक्का? राज्यातील सर्वात मोठी बातमी.
महाराष्ट्रात कोणता पक्ष मोठा? भाजप, शिवसेना की..कोणाला सर्वाधिक जागा?
महाराष्ट्रात कोणता पक्ष मोठा? भाजप, शिवसेना की..कोणाला सर्वाधिक जागा?.
Amravati Exit Poll 2024 : तिरंगी लढत, नवनीत राणांची आघाडी की पिछाडी?
Amravati Exit Poll 2024 : तिरंगी लढत, नवनीत राणांची आघाडी की पिछाडी?.
Beed Exit Poll 2024 : बीडचा कौल कुणाला? पंकजा मुंडे की बजंरग सोनवणे?
Beed Exit Poll 2024 : बीडचा कौल कुणाला? पंकजा मुंडे की बजंरग सोनवणे?.