ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

Bicycle To Girls | राज्यातील 8 ते 12 विद्यार्थ्यांसाठी सायकली मिळणार मोफत; 5 हजार अनुदान दिले जाणार, शासनाने केले जाहीर..

Free bicycles for 8 to 12 students in the state; 5 thousand grant to be given

Bicycle To Girls | 8 ते 12 विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. मानव विकास कार्यक्रम राबविण्या बाबद निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत 8 ते 12 पर्यंत शिक्षण घेत असलेल्या शाळेपासून 5 की. मी अंतरावर पायी ये-जा करणाऱ्या गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात येणार आहे.

गरजू मुलींना सायकल वाटप करण्यासाठी योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना राज्यातील २३ जिल्ह्यांतील १२५ अतिमागास तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. अगोदर मुलींच्या सायकलीसाठी 3 हजार रुपयांचे अनुदान होते.

वाचा –भारतात एचटीबीटी कॉटन उत्पादित करण्यासाठी भारत सरकार अनुकूल, कापूस उत्पादकांचे उत्पन्न होणार दुप्पट…

त्यानंतर 500 रुपये वाढवले होते आणि आता 16 फेब्रुवारी रोजी दीड हजार रुपये वाढवून असे एकूण 5 हजारांचे अनुदान देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे.
लाभधारक मुलींच्या खात्यात थेट जमा करण्यास डीबीटी मान्यता 2018 मधेच दिली आहे. आता याची रक्कम वाढविली आहे. प्रति लाभार्थ्यांला ५ हजार रूपये रक्कम मिळणार आहे.

वाचा –रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना बँकेची कामे आटपून घेण्यासाठी दिल्या सूचना; मार्चमध्ये 13 दिवस बँक बंद राहणार.

अशी मिळणार सायकल –

1) डीबीटीद्वारे पहिल्या टप्प्यात राष्ट्रीयकृत बँक खात्यात ३ हजार ५०० रूपये आगाऊ रक्कम जमा केली जाणार आहे.

2) लाभार्थी मुलींनी सायकल खरेदी केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सायकल खरेदीची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांना उर्वरीत १ हजार ५०० रूपये खात्यात जमा होतील.

3) गरजू मुलींना ८ वी ते १२ वी पर्यंतच्या शालेय शिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यात सायकल खरेदी करण्याची स्वातंत्र्य राहील व त्यांना या चार वर्षामध्ये सायकल खरेदीसाठी एकदाच अनुदान देय दिले जाणार आहे.

4) गरजू मुलींना सायकल वाटप करताना जिथे जाण्यासाठी सुयोग्य रस्ते नाहीत तथा वाहतुकीची पुरेशी साधने नाही, अशा ठिकाणी राहणाऱ्या गरजू मुलींना शासनाच्या आदेशानुसार सर्वप्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.

वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button