MB NEWS-'त्या' विवाहितेच्या आत्महत्येला कारणीभूत लोकांविरुद्ध परळीत गुन्हा; आरोपींवर कारवाईची भावाची आर्त मागणी

'त्या' विवाहितेच्या आत्महत्येला कारणीभूत लोकांविरुद्ध परळीत गुन्हा; आरोपींवर कारवाईची भावाची आर्त मागणी

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
    वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देऊन आपल्या बहिणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून संभाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.मात्र अद्याप आरोपी मोकाट असुन आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी फिर्यादी मयत महिलेच्या भावाने केली आहे.

     याबाबत माहिती अशी की,  स्वाती रामेश्वर उदावंत वय २८ वर्षे या.तुळजाईनगर परळी वैजनाथ या विवाहितेने दि.१ एप्रिल रोजी विष प्राशन केले.तिला उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दि.४ एप्रिल २०२२ रोजी या महिलेचा मृत्यू झाला.याप्रकरणी मयत महिलेचा लहान भाऊ आकाश किशनराव अंबिलवादे रा.तुळजाईनगर , परळी वैजनाथ याने मयत महिलेच्या सासरच्या लोकांविरुद्ध फिर्याद दिली.यानुसार मयत महिलेच्या पतीसह सासरच्या एकूण पाच लोकांवर कलम ४९८(अ),३०६,३४ भादवि प्रमाणे संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     याप्रकरणी आरोपींविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी मयत महिलेच्या भावाने केली आहे.अद्यापही आरोपी मोकाट असुन आपल्या बहिणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या लोकांना कडक शासन व्हावे अशी आर्त मागणी आकाश अंबिलवादे यांनी केली आहे.

Click: परळी शिवारात विहिरीत आढळला मृतदेह

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?