कृषी बातम्या

Fish Farming| एक उत्तम जोडधंदा म्हणून याचा नक्कीच विचार करा! जाणून घ्या मत्स्यशेती बद्दल संपूर्ण माहिती..

Fish Farming | Definitely consider this as a great side business! Learn complete information about fisheries.

आपल्या भारतात 80 टक्के लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी शेतीवरती अवलंबून असतात. बरेच शेतकरी पारंपरिक शेती पद्धतीने शेती करतात व उत्पन्नाचा जास्त लाभ होत नाही. शेतकऱ्यांना शेती सोबत जोडधंदा ही करायला हवा.सरकार नवीन नवीन तंत्रज्ञान व योजना शेतकऱ्यांसाठी घेऊन येत आहे. कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जोडधंद्यातून चांगल्या पद्धतीचा लाभ होतो.शेतीसोबत जोडधंदा शेतकऱ्यांना लाख रुपये मिळवून देण्यास मदत करू शकतात. त्यातलाच जोडधंदा म्हणून मत्स्यशेती याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. नदी कालवे तलावाच्या काठावर राहणारे गरीब मजुर ही शेती करुन आपला उदरनिर्वाह करू शकतात.

मत्स्यपालन का करावे :

मासे पालन कन्या मागे सर्वात मोठा उद्देश म्हणजे मासे अन्न म्हणून वापरले जातात. भारतातील लोकसंख्येपैकी सुमारे 20 टक्के लोक मासे अन्न म्हणून खातात. व त्यामुळे माशांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. भाषांतून मिळणारी प्रथिने ,जीवनसत्वे अनेक औषधांमध्ये आवश्यक असतात. अनेक औषधी कंपन्यांमध्ये माणसांचा तेलाला सुद्धा खूप मागणी आहे. त्यामुळे औषधी बनवण्यास माशांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

वाचा-

मत्स्य पालन व्यवसाय कसा सुरु करावा:

जर तुम्हाला मत्स्य पालना बद्दल काही जास्त अधिक माहिती नसेल तर सरकार द्वारे मोफत परिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आपल्या भारत सरकारच्या मत्स्यपालन विभागात वेळोवेळी शेतकऱ्यांना व मत्स्य पालन सुरु करणाऱ्या अशा लोकांना सरकार परीक्षण देत आहे. मत्स्यपालन विभागाच्या वेबसाईट वरुन तुम्ही मत्स्यपालन करण्याची अधिक माहिती मिळवू शकता. यामध्ये तुम्हाला तलाव स्वच्छ करणे व चांगल्या जातीच्या माशांच्या बिया कुठे उपलब्ध होऊ शकतात या सर्व माहिती तिथे आपल्याला दिली जाते.

मत्स्य पालन प्रकार :

  1. पिंजरा पद्धत (cage system ) –
    या प्रकारची पद्धत समुद्र, तलाव आणि नदीमध्ये केली जाते,.यामध्ये फक्त आपल्याला ज्यावेळी मासे पकडायचे आहेत त्यावेळी आपल्याला थोडा खर्च करावा लागतो.
  1. कृत्रिम तलाव बनवून (Making Artificial Pond) –
    जर मत्स्य पालन व्यवसाय करायचा असेल तर एक कृत्रिम तलाव बनवून हा व्यवसाय सुरू करू शकता.तसेच या व्यवसायमध्ये खर्च थोडा जास्त आहे यामध्ये आपल्याला तळे उभारण्याचा खर्च, ऑक्सिजन, तलावाला सावली देण्याचा खर्च, मासे विकत घेणे, मास्यांना खाद्य देणे, एत्यादी. यामध्ये मेहनतीचा खर्च जास्त आहे .पण चांगल्या प्रकारचे आणि आपल्याला हवे तसे मास्यांचे उत्पादन करता येते. 3.बायोफ्लोक मस्य पालन (Biofloc Fish Farming) –

बायोफ्लोक मस्य पालन मध्ये एक लहान 5 ते 10 मिटर व्यासचे (diamater) गोल आकाराचे तले बनवले जाते 1 मिटर उंचीचे आणि त्यामध्ये मस्य पालन केले जाते, ही एक इस्रायल बेस नवीन टेक्निक आहे आणि याचा आज जास्त प्रमाणात उपयोग आपल्या देशामध्ये पाहायला मिळतो.यामध्ये एक लहान आकाराचे तले बनवण्यासाठी 20 हजार रुपये पर्यत्न खर्च येतो. आपल्याला कमी पैसे गुंतवणूक करून बायोफ्लोक मस्य पालन व्यवसाय करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

ऋतुजा ल. निकम (MBA AGRI)

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button