ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

गांजाची शेती करून हे राज्य करणार हलका करणार आर्थिक बोजा..

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या हिमाचल प्रदेश या राज्यातील शेतकरी सध्या त्रस्त झाला आहे. लालबुंद, रसरशीत सफरचंद हे या राज्यातील मुख्य फळपीक. मात्र गेल्या काही वर्षांपासून लहरी निसर्गामुळे आणि स्वस्त दरात आयात होणाऱ्या सफरचंदांमुळे येथील सफरचंद उत्पादक संकटात सापडले आहेत. त्यातच हिमाचल सरकार वर ७५ हजार कोटींहून अधिक कर्जाचा भार आहे. यावर उपाय म्हणून राज्याचा महसूल वाढवण्यासाठी गांजाची नियंत्रित शेती करण्यास परवानगी देण्याचा विचार करत आहे. गांजा लागवडीचे फायदे आणि तोटे समजून घेण्यासाठी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खु यांनी एका समितीची नियुक्ती केली आहे.

याबाबत बोलताना मुख्यमंत्री सुक्खु म्हणाले, ” औषधी हेतूंसाठी गांजाच्या शेतीला परवानगी देण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे तसेच ८०० ते १००० कोटींचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा होऊ शकतो. गांजाची पाने आणि बियांच्या वापराबाबत आम्ही कायदा करणार आहोत.”

दरम्यान केंद्र सरकारने राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये गांजा लागवड कायदेशीर केली आहे.

शेतकऱ्यांसाठी गांजा शेती फायदेशीर का आहे?
गांजाचे पीक मुख्य पीकामध्ये आंतरपीक म्हणून घेता येते. मुख्यतः पावसाळ्यानंतर लावलेली रोपे ४ ते ६ महिन्यात तोडणीला येतात. या पीकाला पाणी अत्यंत कमी लागते त्यामुळे कोरडवाहू जमिनीतही हे पीक सहज घेता येते. ओली रोपं तोडल्यानंतर त्यांना वाळवून त्यांची भुकटी केली जाते आणि ही वाळलेली पाने गांजा म्हणून विकली जातात. गांजा बनवताना कोणतेही केमिकल्स वापरले जात नाही त्यामुळे गांजा उत्पादनाची प्रक्रिय़ा सोपी मानली जाते. गांजाच्या भुकटीला बाजारात काही हजार रुपये किलो एवढा भाव मिळतो. यामुळे शेतकऱ्यांना अल्प कालावधित उत्पन्न मिळू शकते. मात्र याचा चांगला औषधी उपयोग करण्याऐवजी नशेसाठी उपयोग करण्याकडे लोकांचा कल असतो. त्यामुळे सरकारी परावानगी असल्यासच ही शेती करता येऊ शकते. बिना परवाना गांजा शेती केल्यास तुरुंगाची हवा खावी लागेते.

गांजाचे ओषधी उपयोग कसा होतो?

सर्वसामान्यपणे गांजा म्हटले की हा एक अमली पदार्थ आहे, असाच विचार सर्वप्रथम आपल्या मनात येतो परंतु वैद्यकीय मार्गदर्शनाखाली याचा प्रमाणात वापर केल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. परंतु याचा अनियंत्रीत वापर आरोग्यासाठी घातक असतो एवढे मात्र खरे.

गांजाची गांजाच्या हिरव्य़ा पाल्याचे रुपांतर हे ‘भांग’ य़ा अमली पदार्थात केले जाते. ही भांग आपल्याकडे महाशिवरात्री किंवा रंगपंचमीला सर्रास प्यायली जाते. निद्रानाश, नैराश्य या आजारांमध्ये वैद्यकीय मार्गदर्शनाखाली गांजाचा मर्यादीत वापर उपयुक्त ठरू शकते. तसेच वेदनाशामक, स्वेदकारक तसेच क्षुधावर्धक म्हणूनही गांजा उपयुक्त आहे.

हेही वाचा:

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button