MB NEWS-कोरोना वाढता प्रादुर्भाव: शाळांबाबत काय होणार निर्णय
कोरोना वाढता प्रादुर्भाव: शाळांबाबत काय होणार निर्णय
मुंबई : महाराष्ट्रात जून महिन्याच्या सुरवातीला अचानक कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्यामुळे सर्वत्र पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकारने राज्य सरकारला काही सूचना केल्या आहेत. राज्यात मास्कची सक्ती नसली तरी मास्क वापरण्याचे आव्हान करण्यात येत आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बद्दल काय निर्णय होईल यावर सर्वांचे लक्ष लागले होते. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेबाबत मोठी माहिती दिली आहे.
• click &read:विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण
राज्यात दोन दिवसानी शाळा सुरु होत आहेत. तर काही शाळा या १३ जूनपासून सुरु होत आहेत. शाळा सुरु होण्याआधी पुन्हा नवी नियमावली करण्यात येण्याची शक्यता आहे. तसे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले. त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही. काळजी घेऊन शाळा सुरु करणार आहोत. त्यामुळे शाळा सुरु करताना नवी नियमावली असणार हे आता नक्की झाले आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून शाळा नव्या नियमानुसार सुरु करणार आहोत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड एका माध्यमाशी बोलताना दिली आहे.
*************************************
या बातम्या देखील वाचा/पहा........
• क्लिक करा व पहा:बहुचर्चित कालिचरण महाराज परळीत दाखल होताच पोहोचले वैद्यनाथ मंदिरात....!
• कालिचरण महाराजांच्या उपस्थितीत धर्मसभा ;मोठ्या संख्येने उपस्थित राहा-योगी महाराज यांचे आवाहन.
• *धनंजय मुंडेंचा 'सेल्फी ऑन द रोड'*
• सिरसाळा ग्रामपंचायतीची देखणी इमारत उभी करणार-धनंजय मुंडे*
• *स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या वस्तीगृह परिसरात मृत अर्भक सापडले*
•*गोपीनाथ गडावर स्मृतिदिन समारंभात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते बालिकापुजन*
• *मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचं महाराष्ट्राशी आहे 'हे' जिव्हाळ्याचं नाजुक नातं...!*
*काय मिळेल याची चिंता नको: सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढू- पंकजा मुंडे*
*गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे 'वाढप्याच्या' रूपात..!*
🏵️ *लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर उसळला अलोट जनसागर!* • *(क्षणचित्रे व फोटो फिचर)•*
*गोपीनाथराव मुंडे यांचे जाणे म्हणजे भर दुपारी सूर्य मावळण्या सारखे- हभप रामराव महाराज ढोक*
*धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित गोपीनाथ गडावर नतमस्तक*
*लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्मृतीदिन:पंकजाताई मुंडे यांचे आवाहन*.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा