योजना

Agriculture Yojana | वन्यप्राण्यांमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास भरपाईसाठी करा ‘असा’ अर्ज, जाणून घ्या एका क्लिकवर

Agriculture Yojana | भारत हा कृषिप्रधान देश आहे. पण शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांना शेती (Agriculture Yojana) करताना अतिवृष्टी सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान होतेच. मात्र, शेतकऱ्याला वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीला देखील तोंड द्यावे लागते. वन्य प्राणी उभ्या पिकाचे नुकसान करतात. याचमुळे आता सरकारकडून ही बाब लक्षात घेतली जात आहे. आता या होणाऱ्या नुकसानीस (Agriculture Yojana) शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीला आर्थिक (Financial) सहाय्य मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया यासाठी अर्ज करावा.

वाचाब्रेकींग न्यूज! आता शेती विकत घेण्यासाठी मिळणार अनुदान, पात्रता जाणून त्वरित करा अर्ज

वन्यप्राणी नुकसान भरपाईसाठी कसा कराल अर्ज?
वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीला ‘वन्यप्राणी नुकसान भरपाई योजनें’तर्गत शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) सहाय्य दिले जात आहे. ज्या शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. हा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला फॉरेस्ट महाराष्ट्र (Forest Maharashtra) सर्च करावे लागेल. https://intranet.mahaforest.gov.in/forestportal/ या संकेतस्थळावरून तुम्ही या होणाऱ्या नुकसानीसाठी अर्ज करावा लागेल. ज्यामध्ये तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. यानंतर विचारलेली माहिती भरून तुमचा अर्ज सबमिट करावा लागेल.

वन्यप्राणी करतात पिकाचे नुकसान
अनेकदा शेतीचे वन्य हत्ती, डुक्कर, माकडे अशाप्रकारच्या प्राण्यांमुळे शेतीतील पिकाचे नुकसान होते. यासाठी अनेक योजनांद्वारे शेतकऱ्यांना (Department of Agriculture) प्रोत्साहन दिले जाते. यासाठी कुंपण योजना देखील राबवली जाते. मात्र या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना फारसा लाभ मिळत नाही. म्हणूनच आता वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीला ‘वन्यप्राणी नुकसान भरपाई योजनें’तर्गत शेतकऱ्यांना आर्थिक (Financial) सहाय्य दिले जात आहे.

वाचा: आंतरजातीय विवाह आणि ‘लव्ह जिहाद’विरोधात कडक कारवाईची तयारी! शिंदे सरकारने उचललं मोठं पाऊल

पिकाच्या संरक्षणासाठी मिळते कुंपण अनुदान
वन्यप्राण्यांची वाढती संख्या पाहता शेतकर्‍यांना रात्री-अपरात्री पिकाचे संरक्षण करण्यासाठी पिकाची देखभाल करण्यासाठी जावे लागत होते. रात्री-अपरात्री पिकाचे संरक्षण करणा-यावेळी शेतकऱ्यांच्या जीवाला धोका देखील निर्माण होऊ शकत होता. कारण वन्यप्राणी शेतकऱ्यांवर अचानक हल्ला देखील करू शकतात. या सर्व गोष्टींचा विचार करता महाराष्ट्र राज्यातील संवेदनशील गावांमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत व्याप्ती करून त्यात आता सौर ऊर्जा कुंपण उभारण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते. शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Apply for compensation in case of damage to agricultural crops due to wild animals, know in one click

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button