एक्स्प्लोर

ऑपरेशन सुरु असताना लाईट गेली, जनरेटरही नाही! वाशिमच्या सरकारी दवाखान्यात डॉक्टरांनी मोबाईल टॉर्चच्या आधारानं केली 10 ऑपरेशन्स

वाशिमच्या राजाकिन्ही आरोग्यवर्धनी केंद्रात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने 10 महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मोबाईल टॉर्चच्या मदतीने केल्या गेल्याचं समोर आलं आहे. 

Washim Hospital Issue : आरोग्य सुविधांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केल्याचा दावा शासनाकडून केला जात असतानाच वाशिममधून (washim latest news updates) एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया सुरु असताना वीजपुरवठा खंडित झाल्यानं वाशिममध्ये डॉक्टरांवर मोबाईलच्या टॉर्चचा (washim News govt hospital Power cut during surgery in Washim Doctors performed 10 operations with help of mobile torch) आधार घेत ऑपरेशन करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीतही ऑपरेशन्स पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांचं मात्र सर्वत्र कौतुक होत आहे. 

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे डॉक्टरांनी मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात 10 महिलांच्या शस्त्रक्रिया केल्या. वाशिमच्या राजाकिन्ही आरोग्यवर्धिनी केंद्रात जनरेटर, इनव्हर्टरची सोय नसल्याने डॉक्टरांवर ही वेळ आली. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने 10 महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मोबाईल टॉर्चच्या मदतीने केल्या गेल्याचं समोर आलं आहे. 

या प्रकरणात डॉक्टरांनी ही तत्परता दाखवली असली तरी आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार या निमित्तानं समोर आला आहे. हॉस्पिटलला विजेच्या पुरेसा पुरवठा न होणं या गोष्टी आरोग्य यंत्रणेची लक्तर वेशीवर टांगणाऱ्या तर आहेत, पण, अनेकांच्या जीवाशी खेळही होत असल्याची नागरिकांची भावना आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक असल्याची भावना रुग्ण आणि नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.  

डॉक्टरांनी तत्परता दाखवली पण...

काल रात्री जवळपास वीस महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया असताना वारंवार विद्युत पुरवठा खंडित होऊन अडथळा येत होता. यामुळं शस्त्रक्रियेत अडथळा येऊ नये याकरता डॉक्टरांनी तत्परता दाखवत मोबाईल टॉर्चचा आधार घेतला. मात्र आरोग्यवर्धिनी केंद्रात इन्व्हर्टर, जनरेटरची सुविधा नसल्याने आश्चर्य व्यक्त केली जात आहे. 

इन्व्हर्टर आणि जनरेटर बंद अवस्थेत

डॉ एस के झळके यांनी यावर बोलताना म्हटलं की, रात्रीच्या प्रकरणात 18 ते 20 ऑपरेशन्स करायचे होते. या ऑपरेशन्सला विलंब झाला. रात्री 10 मिनिटं लाईटही गेली होती. सोलर आहे मात्र तो वर्किंग नाही, त्यामुळं विलंब झाला. यामुळं मोबाईलच्या उजेडाचा आधार घेतला जो योग्य नाही. इन्व्हर्टर आणि जनरेटर बंद अवस्थेत आहे. आपल्या जिल्ह्यात सर्जन कमी आहेत. त्यांच्यावर कामाचा लोड जास्त आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

या प्रकारानं रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. आता या प्रकरणी प्रशासनाकडून नेमकी काय कार्यवाही केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ही बातमी देखील वाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
घसा बसला तरीही शरद पवार मैदानात; ओमराजेंसाठी अजित पवारांच्या सासरवाडीत गाजवली सभा
घसा बसला तरीही शरद पवार मैदानात; ओमराजेंसाठी अजित पवारांच्या सासरवाडीत गाजवली सभा
Vishal Patil : बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई होणार की नाही? काँग्रेस नेते कारवाईवर म्हणाले तरी काय??
बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई होणार की नाही? काँग्रेस नेते कारवाईवर म्हणाले तरी काय??
ना हार्दिक, ना पंत, 6 वेळच्या आयपीएल विजेत्यानं निवडला विश्वचषकासाठी संघ
ना हार्दिक, ना पंत, 6 वेळच्या आयपीएल विजेत्यानं निवडला विश्वचषकासाठी संघ
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

CM Eknath Shinde Full Speech : आता फक्त धनुष्यबाण जिंकणार, दोघांची भांडण तिसऱ्यांचा लाभ नाही होणारCM Eknath Shinde meets Vinod Patil : भुमरेंना उमेदवारी, विनोद पाटलांची माघार, मुख्यमंत्री भेटीलाCM Eknath Shinde PC : नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार , शिवसेना तडजोड न करण्याचा भूमिकेतTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 25 April 2024 : 3 PM ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
माजी क्रिकेटपटूवर बिबट्या काळ बनून आला, पण पाळीव कुत्रा देवासारखा धावून आला!
घसा बसला तरीही शरद पवार मैदानात; ओमराजेंसाठी अजित पवारांच्या सासरवाडीत गाजवली सभा
घसा बसला तरीही शरद पवार मैदानात; ओमराजेंसाठी अजित पवारांच्या सासरवाडीत गाजवली सभा
Vishal Patil : बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई होणार की नाही? काँग्रेस नेते कारवाईवर म्हणाले तरी काय??
बंडखोर विशाल पाटलांवर कारवाई होणार की नाही? काँग्रेस नेते कारवाईवर म्हणाले तरी काय??
ना हार्दिक, ना पंत, 6 वेळच्या आयपीएल विजेत्यानं निवडला विश्वचषकासाठी संघ
ना हार्दिक, ना पंत, 6 वेळच्या आयपीएल विजेत्यानं निवडला विश्वचषकासाठी संघ
Konkona Sen Sharma :  10 वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर आता 7 वर्ष लहान अभिनेत्याला कोंकणा करतेय डेट
10 वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर आता 7 वर्ष लहान अभिनेत्याला कोंकणा करतेय डेट
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'ही जागा...'
नाशिकच्या जागेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'ही जागा...'
''पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी षडयंत्र तर नाही ना?''; धनुभाऊंच्या भूमिकेवर संशय, प्रमाणपत्रावरुन विरेंद्र पवारांचा पलटवार
''पंकजा मुंडेंना पाडण्यासाठी षडयंत्र तर नाही ना?''; धनुभाऊंच्या भूमिकेवर संशय, प्रमाणपत्रावरुन विरेंद्र पवारांचा पलटवार
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नाराज विनोद पाटील भूमिका बदलणार? खैरेंच्या विरोधात संदीपान भुमरेंना पाठिंबा देणार का?
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नाराज विनोद पाटील भूमिका बदलणार? खैरेंच्या विरोधात संदीपान भुमरेंना पाठिंबा देणार का?
Embed widget