एक्स्प्लोर

Gadchiroli: गडचिरोलीत वाघिणीला जेरबंद करण्याच्या मोहिमेला वेग, 100 जणांच्या पथकाची नेमणूक

गडचिरोली जिल्ह्यात दहा नागरिकांना ठार मारणाऱ्या टी 6 वाघिणीला जेरबंद करण्याची मोहिम  वेगवान झाली आहे. या वाघिणीला पाच महिन्यांची चार पिले असल्याने तिला जेरबंद करण्यात अडचणी येत आहेत.

गडचिरोली: गडचिरोलीत वाघिणीला जेरबंद करण्याच्या  मोहिमेला वेग आला आहे.  दहा जणांचा बळी घेणाऱ्या टी-6 वाघिणीला जेरबंद करण्यासाठी 100 जणांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.  गेले काही दिवस या भागात सातत्याने नरभक्षी प्रवृत्ती दर्शविलेल्या या वाघिणीला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ झाले आहेत.  आक्रमक, वाघिणीला पकडण्यासाठी ताडोबाच्या रॅपिड रिस्पॉन्स टीम झाली दाखल झाली आहेत 

गडचिरोली जिल्ह्यात दहा नागरिकांना ठार मारणाऱ्या टी 6 वाघिणीला जेरबंद करण्याची मोहिम  वेगवान झाली आहे. या वाघिणीला पाच महिन्यांची चार पिले असल्याने तिला जेरबंद करण्यात अडचणी येत आहेत. गेले काही दिवस या भागात सातत्याने नरभक्षी प्रवृत्ती असलेल्या या वाघिणीला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. धानोरा तालुक्यातील चातगाव वनपरिक्षेत्रातल्या आंबेशिवणी या भागात 100 अधिकारी- वनकर्मचारी- वनमजूर व (रॅपिड रिस्पॉन्स टीम) जलद  प्रतिसाद पथकाच्या जवानांची यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. 

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या तज्ज्ञांचा देखील पथकात समावेश आहे. वाघिणीने पुढचा हल्ला करण्याच्या आधी तिला डार्ट मारून बेशुद्ध करत जेरबंद करण्यासाठी वन कर्मचारी सरसावले आहेत. ही वाघीण जेरबंद करण्यासाठी वनविभाग सर्व शक्तीने प्रयत्न करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

वाघिणीला पकडण्यासाठी काय उपाययोजना केली?

  • जवळपास 70 हून अधिक कॅमेरे ट्रॅप आंबेशिवणीसह इतर गावांच्या जवळच्या जंगल परीसरात लावले आहेत 
  •  थर्मल ड्रोनने निघणारी 
  • 100 लोकांची तैनाती यात वन कर्मचारी आणि गावातील PRT चा समावेश

मागील वर्षी गडचिरोलीसह तीन जिल्ह्यात 13 लोकांचा बळी घेणारा सि टी 1 वाघाला जेरबंद करण्यात आले. सि टी 1 वाघाने गडचिरोली भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात धुमाकूळ घालत होते. त्यामुळे लोकांचा रोष रस्त्यावर उतरला. वाघाला जेरबंद करण्यासाठी अनेक आंदोलने झाली आहेत.  अखेर त्याला पकडण्याचे आदेश वनविभागाला देण्यात आले.  सिटी 1 वाघाला पकडण्यासाठी मोठा सापळा रचला शूटरची टीम जिल्ह्यात दाखल झाली  आणि अखेर 13 ऑक्टोबर रोजी वाघाला डार्ट मारून (बेशुद्धीचे इंजेकशन ) बेशुद्ध करण्यात आले.  सि टी 1 वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले

टी -6 वाघिणीला पकडन इतकं सोपे नाही. कारण त्या वाघीणीसोबत तिचे चार पिल्ले देखील आहेत त्यामुळे त्यांना सुरक्षित ठेवून वाघिणीला पकडणे वनविभागापुढे आव्हान असणार आहे. टी 6 वाघीणीने त्या चार पिल्लांना नेमकं कुठे जन्म दिल हे अजून ही स्पष्ट नाही मात्र गडचिरोली जिल्ह्यात त्या वाघिणीला वावर सतत असल्याने आणि त्या पिलांचे वय 4 ते 5 महिन्याचे असल्याचे वनविभागाने सांगितले आहे.

 टी 6 वाघीण सध्या चातगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कक्ष क्र 413 मध्ये तीन चार दिवसांनआधी दिसून आली होती त्या भागात वाघाला पाहिजे तसं झुडपी जंगल आणि तलाव देखील आहे. वाघिणीच्या त्या पिल्लांसाठी पोषक वातावरण असल्याने त्याचा वावर सध्या भागात दिसत आहे. त्याच भागात 26 डिसेंबर रोजी आंबेटोला गावातील मंगला कोडापे 50 वर्षीय महिलेला शेतात काम करत असताना ठार केले होते त्यामुळे लोकांचा रोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. लोकांना मारून धुमाकूळ घालणाऱ्या  टि 6 वाघीनेने आतापर्यंत 10 लोकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे 11 वा बळी जाण्याच्या आधीच त्याला जेरबंद करणे महत्वाचे असले तरी तिच्या चार बछड्यांना सुरक्षित ठेवून त्याला जेरबंद करणे वनविभागाला तितकेच आव्हानात्मक असणार आहे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Amol Kolhe Video : इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Govinda Ahuja: कला आणि संस्कृतीसाठी काम करेन; दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडेन- गोविंदाVare Nivadnukiche : निवडणुकीची प्रत्येक बातमी एका क्लिकवर : 28 March 2024Maharashtra Superfast News : विदर्भ ते कोकण, महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या : 28 March 2024Loksabha Election 2024 Sangli : सांगलीतून दोन पैलवान निवडणुकीच्या आखाड्यात ! जय - वीरूची बुलेट राईड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Amol Kolhe Video : इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
Whatsapp : व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
Shivsena First List : मुलाची उमेदवारी राखीव, कल्याण, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर एकनाथ शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
मुलाची उमेदवारी राखीव, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
Hemant Godse : खासदार श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर करूनही हेमंत गोडसे गॅसवर; पहिल्या यादीत नाव नाहीच!
खासदार श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर करूनही हेमंत गोडसे गॅसवर; पहिल्या यादीत नाव नाहीच!
Kolhapur Loksabha : कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
Embed widget