एक्स्प्लोर

Coronavirus Cases India Highlights : देशात पहिल्यांदाच 2.73 लाख नवे रुग्ण, गेल्या 24 तासांत 1619 कोरोनाबाधितांचा मृत्यू

Coronavirus Cases India Highlights : भारतात कोरोना व्हायरस महामारीची दुसरी लाट सप्टेंबर 2020 मध्ये आलेल्या पहिल्या लाटेहून अधिक भयावह आहे. कारण नव्या लाटेत नव्या कोरोना बाधितांची वाढ झपाट्यानं होत आहे. गेल्या 24 तासांत 273,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

Coronavirus Cases India Highlights : देशात कोरोना बाधितांच्या संख्येनं आतापर्यंत सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. दररोज कोरोनाबाधितांचा आकडा नवा उच्चांक गाठत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 273,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 1619 कोरोनाबाधित रुग्णांना आपले प्राण गमवाव लागले आहेत. दरम्यान, 1,44,178 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याआधी राज्यात शनिवारी 261,500 नव्या कोरोन बाधितांची नोंद झाली होती. 

देशातील आजची कोरोना स्थिती : 

एकूण कोरोना बाधित रुग्ण : एक कोटी 50 लाख 61 हजार 919
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 29 लाख 53 हजार 821 
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 19 लाख 29 हजार 329
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 1 लाख 78 हजार 769
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 12 कोटी 28 लाख 52 हजार 566 डोस 

राज्यात 1 मेपर्यंत कलम 144 लागू 

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. रविवारी पुन्हा एकदा राज्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी  68 हजार 631 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर काल 45 हजार 654 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 31 लाख 6 हजार 828 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 70 हजार 388 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 80.92 टक्के  झाले आहे. राज्यात काल मृतांचा आकडाही 500 च्या वर गेला आहे. काल एकूण 503 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.58 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 60 हजार 473 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल नोंद झालेल्या 503 मृत्यूंपैकी 210 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 128 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 165 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत. राज्यात सरकारनं 1 मेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. 

आतापर्यंत 12 कोटी 38 लाख लोकांना लसीचे डोस 

देशात 16 जानेवारी रोजी कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. 18 एप्रिलपर्यंत देशभरात 12 कोटी 38 लाख 52 हजार 566 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, रविवारी 12 लाख 30 हजार लसीचे डोस देण्यात आले. लसीचा दुसरा डोस देण्याच्या अभियानाला 13 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण सुरु आहे. 

भारतातील दुसरी कोरोनाची लाट अधिक भयावह 

भारतात कोरोना व्हायरस महामारीची दुसरी लाट सप्टेंबर 2020 मध्ये आलेल्या पहिल्या लाटेहून अधिक भयावह आहे. कारण नव्या लाटेत नव्या कोरोना बाधितांची वाढ झपाट्यानं होत आहे. लैंसेट कोविड-19 कमीशन इंडिया टास्क फोर्सच्या एका रिपोर्टनुसार, फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत 10,000 ते 80,000 नव्या कोरोनाबाधितांची नोंद 40 दिवसांपेक्षा कमी वेळात झाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दबावाला बळी पडू नका, हा विषय समाजाचा; काँग्रेस आमदार धंगेकर ससून रुग्णालयाच्या डीनच्या भेटीला
दबावाला बळी पडू नका, हा विषय समाजाचा; काँग्रेस आमदार धंगेकर ससून रुग्णालयाच्या डीनच्या भेटीला
Shashi Kapoor Shabana Azmi :  शशी कपूरसोबत इंटिमेट सीन करताना 'अशी' झालेली शबाना आझमींची अवस्था; म्हणाल्या,
शशी कपूरसोबत इंटिमेट सीन करताना 'अशी' झालेली शबाना आझमींची अवस्था; म्हणाल्या,"घाम फुटला, डोळ्यात पाणी"
Andre Russell Dances With Ananya Pandey: लुट पुट गया...; आंद्रे रसेल अन् अनन्या पांडेचा डान्स, सोशल मीडियावर फक्त या व्हिडीओचीच चर्चा
लुट पुट गया...; आंद्रे रसेल अन् अनन्या पांडेचा डान्स, सोशल मीडियावर फक्त या व्हिडीओचीच चर्चा
मनमाड युनियन बँक घोटाळ्याची आमदार कांदेंकडून दखल, स्वतः फिर्यादी होत अधिकाऱ्यांविरोधात दाखल केला गुन्हा
मनमाड युनियन बँक घोटाळ्याची आमदार कांदेंकडून दखल, स्वतः फिर्यादी होत अधिकाऱ्यांविरोधात दाखल केला गुन्हा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 12: 00 PM 28 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal On MLC Election: मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक राष्ट्रवादीने लढवावी -भुजबळChanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचा वेगवान आढावा : 28 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 11: 00 AM 28 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दबावाला बळी पडू नका, हा विषय समाजाचा; काँग्रेस आमदार धंगेकर ससून रुग्णालयाच्या डीनच्या भेटीला
दबावाला बळी पडू नका, हा विषय समाजाचा; काँग्रेस आमदार धंगेकर ससून रुग्णालयाच्या डीनच्या भेटीला
Shashi Kapoor Shabana Azmi :  शशी कपूरसोबत इंटिमेट सीन करताना 'अशी' झालेली शबाना आझमींची अवस्था; म्हणाल्या,
शशी कपूरसोबत इंटिमेट सीन करताना 'अशी' झालेली शबाना आझमींची अवस्था; म्हणाल्या,"घाम फुटला, डोळ्यात पाणी"
Andre Russell Dances With Ananya Pandey: लुट पुट गया...; आंद्रे रसेल अन् अनन्या पांडेचा डान्स, सोशल मीडियावर फक्त या व्हिडीओचीच चर्चा
लुट पुट गया...; आंद्रे रसेल अन् अनन्या पांडेचा डान्स, सोशल मीडियावर फक्त या व्हिडीओचीच चर्चा
मनमाड युनियन बँक घोटाळ्याची आमदार कांदेंकडून दखल, स्वतः फिर्यादी होत अधिकाऱ्यांविरोधात दाखल केला गुन्हा
मनमाड युनियन बँक घोटाळ्याची आमदार कांदेंकडून दखल, स्वतः फिर्यादी होत अधिकाऱ्यांविरोधात दाखल केला गुन्हा
Pune Porsche Accident: विशाल अग्रवालची महागडी गाडीच लाडोबाचा 'कार'नामा करणार उघड; पोर्शेच्या टीमकडून कारची पाहणी पूर्ण, काय लागलं हाती?
विशाल अग्रवालची महागडी गाडीच लाडोबाचा 'कार'नामा करणार उघड, काय लागलं हाती?
Panchayat 3 Cast Fees : जितेंद्र कुमार, नीना गुप्ता ते रघुबीर यादव; जाणून घ्या 'पंचायत 3'मधील कलाकारांच्या मानधनाबद्दल...
जितेंद्र कुमार, नीना गुप्ता ते रघुबीर यादव; जाणून घ्या 'पंचायत 3'मधील कलाकारांच्या मानधनाबद्दल...
Team India : नरेंद्र मोदी, अमित शाह ते सचिन तेंडुलकर, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी बोगस नावांच्या अर्जांचा पाऊस
नरेंद्र मोदी, अमित शाह ते सचिन तेंडुलकर, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी बोगस नावांच्या अर्जांचा पाऊस
Pune Car Accident: पुणे अपघातप्रकरणात मोठा ट्विस्ट, ससूनमधला 'तो' कर्मचारी गायब, पोलीस CCTV फुटेज  तपासणार
पुणे अपघातप्रकरणात मोठा ट्विस्ट, ससूनमधला 'तो' कर्मचारी गायब, पोलीस CCTV फुटेज तपासणार
Embed widget