हवामान

Weather | पुढचे तीन दिवस राज्यात सर्वत्र विजांसह बरसणार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Weather | राज्यात परतीचा पाऊस 5 ऑक्टोबर रोजी येणार आहे. जो आता राजस्थानमध्ये आहे. त्याचंवेळी सध्या मुंबईत या पावसाची कुणकुण जाणवत आहे. बुधवारी मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. आता हवामान विभागाने (Meteorological Department) पुढचे तीन दिवस राज्यात सर्वत्र पाऊस (Weather Update) कोसळणार यांचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांनी स्वतः सोबतच आपल्या शेती (Agriculture) पिकांची काळजी घेणे महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात पुढचे तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कसा असेल.

वाचा: गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! एफडीवर मिळणार 10 लाखांचा रिटर्न, जाणून घ्या पॉलिसी

आज कोठे पडणार पाऊस?
कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विजा व गडगडाटासह मध्यम पाऊस बरसेल. तर नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, ठाणे या जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पाऊस होऊ शकतो.

वाचा: एलपीजी ग्राहकांसाठी मोठी बातमी! वर्षभरात मिळणार फक्त ‘इतके’च सिलिंडर अन् महिन्याचा कोटाही निश्चित

उद्याही पावसाची शक्यता
त्याचवेळी हवामान विभागाने 30 सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याचवेळी शनिवारी देखील राज्यातील सर्वत्र भागांत विजांसह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Meteorological Department has warned that there will be rain with lightning all over the state for the next three days

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button