MB NEWS-■ *माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त ११ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन*

 ■ *माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त ११ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन* 



 • _मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन_ 


परळी वैजनाथ/ प्रतिनिधी......

     ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे परळी शहरातील कर्तृत्ववान उमदे युवा नेतृत्व व परळीच्या सर्वांगीण विकासाचा मुख्यदुवा म्हणून यशस्वी कारकीर्द निर्माण केलेले माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचेलोकप्रिय शहराध्यक्ष  बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त  (दि.११) रोजी  रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

       राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या प्रेरणेने बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बाजीरावभैया धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 11 ऑगस्ट रोजी स्व. श्री. मणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह,आंबेवेस, परळी वैजनाथ येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० वा.पासुन शिबिराचा शुभारंभ होणार आहे.        

          दरवर्षी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. गेल्या 10 वर्षांपासुन सातत्याने घेण्यात येणारे व मोठ्या सहभागाचे शिबीर म्हणून हा सामाजिक उपक्रम परळीत अग्रेसर ठरलेला आहे.दर वर्षी नवनविन रक्तदात्यांना प्रोत्साहित करून रक्तदानाचे कार्य रूजविणे बाबत जागृती करणारा परळीतील हा उपक्रम आहे.या शिबिरात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन बाजीराव भैय्या  धर्माधिकारी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे




-------------------------------------------------------

Video News :

--------------------------------------------------------

- video news-

--------------------------------------------------------

Video News :

-------------------------------------------------------

Video News :


-------------------------------------------------------





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?