एक्स्प्लोर

Adar Poonawalla on Twitter | सीरमकडून कोरोना लसीची किंमत कमी, अदर पुनावाला यांची ट्विटद्वारे माहिती

सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोरोना लसीची किंमत कमी करण्यात आली आहे. कंपनीचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

मुंबई : सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लसीची किंमत कमी केली आहे. सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ही माहिती ट्विटरवरुन दिली आहे. नवीन किमतीनुसार सीरमची 'कोविशील्ड'ची किंमत राज्य सरकारसाठी आता 400 ऐवजी 300 रुपये प्रति डोस असणार आहे. राज्य सरकारने 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या दृष्टीकोनातून ही मोठी बातमी आहे.

सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीने परोपकारी भाव म्हणून राज्यांना कोरोना लस आता 400 रुपयांऐवजी 300 रुपयांना मिळणार असून याची तत्काळ अमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे राज्यांचे हजारो कोटी रुपये वाचणार असून या निधीमुळे लसीकरण अधिक सक्षम होऊन असंख्य जीव वाचतील, असे ट्वीट सीरमेच सीईओ अदर पुनावाला यांनी केलं आहे.

यापूर्वी बुधवारी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ने सांगितलं होतं की, "कोविड-19 लस 'कोविशील्ड'ची किंमत राज्य सरकारसाठी 400 रुपये प्रति डोस आणि खासजी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस असणार आहे. कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "150 रुपये प्रति डोसचा सध्याचा करार संपल्यानंतर केंद्र सरकारसाठीही लसीच्या प्रति डोसची किंमत 400 रुपये प्रति डोस असणार आहे. सीरम इंन्सिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या निवेदनात सांगितलं की, "भारत सरकारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी 50 टक्के आणि उरलेला 50 टक्के राज्य सरकार आणि खाजगी रुग्णालयांसाठी देण्यात येणार आहे."

महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण
वय वर्ष 18 ते 44 अशा वयोगटातील नागरिकांना लसीकरणाच्या नव्या टप्प्यात 1 मे पासून लस देण्यात येणार आहे. या वयोगटात राज्यात 5 कोटी 71 लाखांहून अधिन नागरिक आहेत. यासाठी तब्बल 12 कोटींच्या लसींची आवश्यकता राज्याला असणार आहे. यासाठीच्या खर्चाचा भार राज्य सरकारवर असणार आहे. लसीकरणाच्या या टप्प्यासाठी राज्य शासनाच्या तिजोरीवर 6 हजार 500 कोटी रुपयांचा भार असणार आहे. पण, कोरोनाविरोधातील या लढ्यात राज्य शासनानं मोठ्या जबाबदारीनं हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident: धनिकपुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, 'या' कारणासाठी येरवाडा पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर खायला दिला?
धनिकपुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, 'या' कारणासाठी येरवाडा पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर खायला दिला?
Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
Panchayat 3 Review : फुलेरा गाववाले घेऊन आलेत मनोरंजनाचा ट्रिपल डोस; वाचा 'पंचायत 3'चा रिव्ह्यू
फुलेरा गाववाले घेऊन आलेत मनोरंजनाचा ट्रिपल डोस; वाचा 'पंचायत 3'चा रिव्ह्यू
Buldhana Crime News: क्लबमध्ये जुगारात घबाड मिळालं, प्रकाशशेठ मालामाल; पण वैऱ्यांनी खामगाव बसस्टँडवर खेळ खल्लास केला
क्लबमध्ये जुगारात घबाड मिळालं, प्रकाशशेठ मालामाल; पण वैऱ्यांनी खामगाव बसस्टँडवर खेळ खल्लास केला
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Car Accident : ब्लॅड सॅम्पल बदलणाऱ्या डॉक्टरांवर महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलची कारवाई?ABP Majha Headlines : 08: 00  May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सIndiGo Flight Gets Bomb Threat : इंडिगोच्या दिल्ली वाराणसी विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकीVidhan Sabha Election Maharashtra : लोकसभेच्या निकालानंतरच ठरणार महायुतीची विधानसभा रणनीती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident: धनिकपुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, 'या' कारणासाठी येरवाडा पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर खायला दिला?
धनिकपुत्राला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, 'या' कारणासाठी येरवाडा पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर खायला दिला?
Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
Panchayat 3 Review : फुलेरा गाववाले घेऊन आलेत मनोरंजनाचा ट्रिपल डोस; वाचा 'पंचायत 3'चा रिव्ह्यू
फुलेरा गाववाले घेऊन आलेत मनोरंजनाचा ट्रिपल डोस; वाचा 'पंचायत 3'चा रिव्ह्यू
Buldhana Crime News: क्लबमध्ये जुगारात घबाड मिळालं, प्रकाशशेठ मालामाल; पण वैऱ्यांनी खामगाव बसस्टँडवर खेळ खल्लास केला
क्लबमध्ये जुगारात घबाड मिळालं, प्रकाशशेठ मालामाल; पण वैऱ्यांनी खामगाव बसस्टँडवर खेळ खल्लास केला
Monsoon Update: कोकण अन् दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त राहणार; जूनपासूनच मुसळधार पाऊस पडणार
कोकण अन् दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर जास्त राहणार; जूनपासूनच मुसळधार पाऊस पडणार
Marathwada Drought: पाण्यासाठी रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र; छत्रपती संभाजीनगरात एकएका थेंबासाठी धडपड, ABP माझाच्या कॅमेऱ्यात भीषण वास्तव कैद!
पाण्यासाठी रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र; एकएका थेंबासाठी धडपड, ABP माझाच्या कॅमेऱ्यानं टिपलं भीषण वास्तव!
Riyan Parag: 'सारा अली खान हॉट, अनन्या पांडे हॉट...', रियान परागची यूट्यूब हिस्ट्री लीक
Riyan Parag: 'सारा अली खान हॉट, अनन्या पांडे हॉट...', रियान परागची यूट्यूब हिस्ट्री लीक
IPL 2024 : रायडूची विराट कोहलीवर टीका, पीटरसनने उडवली खिल्ली, म्हणाला जोकर 
IPL 2024 : रायडूची विराट कोहलीवर टीका, पीटरसनने उडवली खिल्ली, म्हणाला जोकर 
Embed widget