एक्स्प्लोर

Kishore Nandlaskar Death | ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन झाले. ठाण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं करोनाने निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना करोनाची लागण झाली होती. यानंतर तातडीने त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आज दुपारी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 

किशोर नांदलस्कर यांचे मूळ गाव खारेपाटण तालुक्यातील शेजवली. त्यांचा जन्म मुंबईचाच. मुंबईत लॅमिंग्टन रस्ता, नागपाडा, घाटकोपर आणि अन्य काही भागात त्यांचे लहानपण गेले. ‘न्यू इरा हायस्कूल’ आणि ‘युनियन हायस्कूल’ येथे त्यांचं शालेय शिक्षण झालं. किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. त्या काळात त्यांनी नाटकांमधून स्त्री भूमिका केल्या होत्या. केशवराव दाते यांच्या नाटक कंपनीत तसेच अन्य काही नाटकांमधून त्यांनी काम केले होते. नांदलस्कर यांनी सुमारे 40 नाटके, 25 हून अधिक मराठी व हिंदूी चित्रपट आणि 20 हून अधिक मालिकांमधून काम केले आहे. ‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम केलेले शेवटचे नाटक. ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ आणि इतर काही चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत. ‘विच्छा माझी पुरी करा’ हे नाटक नव्याने पुन्हा रंगभूमीवर सादर झालं. या नाटकातील ‘राजा’ची भूमिका तसेच दिलीप प्रभावळकर यांनी लोकप्रिय केलेले ‘वासूची सासू’ हे नाटकही नव्याने रंगभूमीवर सादर झालं. यात प्रभावळकर यांची भूमिका नांदलस्कर यांना साकारायची संधी मिळाली. व्यावसायिक रंगभूमीवर नांदलस्कर यांनी ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून प्रेक्षकांना पोट धरून हसवलं.

महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’ (गोविंदा), ‘तेरा मेरा साथ है’ (अजय देवगण), ‘खाकी’ (अमिताभ बच्चन) यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली. ‘चाल जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांतही त्यांची भूमिका होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Riyan Parag: 'सारा अली खान हॉट, अनन्या पांडे हॉट...', रियान परागची यूट्यूब हिस्ट्री लीक
Riyan Parag: 'सारा अली खान हॉट, अनन्या पांडे हॉट...', रियान परागची यूट्यूब हिस्ट्री लीक
IPL 2024 : रायडूची विराट कोहलीवर टीका, पीटरसनने उडवली खिल्ली, म्हणाला जोकर 
IPL 2024 : रायडूची विराट कोहलीवर टीका, पीटरसनने उडवली खिल्ली, म्हणाला जोकर 
Watch : हार्दिक पांड्याला नताशा धोका देत होती? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चेला उधाण
Watch : हार्दिक पांड्याला नताशा धोका देत होती? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चेला उधाण
शेकडो इलेक्ट्रिक पोल कोसळले, पोलिस स्टेशनवरचे पत्रे उडाले; वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान
शेकडो इलेक्ट्रिक पोल कोसळले, पोलिस स्टेशनवरचे पत्रे उडाले; वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 27 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सWater Crisis Special Report : दुष्काळग्रस्त गावांना मोफत पाणी...महाराष्ट्राची तहान भागवणारा भागीरथ!Sassoon Doctors in Pune Car Case Special Report :ब्लड सँपल कचऱ्यात फेकले, ससूनची 'कसून' चौकशी करणार?Chhagan Bhujbal on Seat Sharing Special Report : भुजबळांचं वक्तव्य, विधानसभा जागावाटपावरुन राडा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Riyan Parag: 'सारा अली खान हॉट, अनन्या पांडे हॉट...', रियान परागची यूट्यूब हिस्ट्री लीक
Riyan Parag: 'सारा अली खान हॉट, अनन्या पांडे हॉट...', रियान परागची यूट्यूब हिस्ट्री लीक
IPL 2024 : रायडूची विराट कोहलीवर टीका, पीटरसनने उडवली खिल्ली, म्हणाला जोकर 
IPL 2024 : रायडूची विराट कोहलीवर टीका, पीटरसनने उडवली खिल्ली, म्हणाला जोकर 
Watch : हार्दिक पांड्याला नताशा धोका देत होती? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चेला उधाण
Watch : हार्दिक पांड्याला नताशा धोका देत होती? व्हायरल व्हिडीओनंतर चर्चेला उधाण
शेकडो इलेक्ट्रिक पोल कोसळले, पोलिस स्टेशनवरचे पत्रे उडाले; वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान
शेकडो इलेक्ट्रिक पोल कोसळले, पोलिस स्टेशनवरचे पत्रे उडाले; वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान
नेरळ-माथेरान टॉय ट्रेनचं रुपडं पालटणार, वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा वैभवशाली इतिहास जिवंत होणार
नेरळ-माथेरान टॉय ट्रेनचं रुपडं पालटणार, वाफेवर चालणाऱ्या इंजिनचा वैभवशाली इतिहास जिवंत होणार
मैत्रिणीसाठी लावली जीवाची बाजी;  नांदेड जिल्ह्यात तीन युवतींचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा
मैत्रिणीसाठी लावली जीवाची बाजी; नांदेड जिल्ह्यात तीन युवतींचा बुडून मृत्यू, गावावर शोककळा
'घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते', हायकोर्टानं सिडकोला खडसावलं 
'घाटकोपर दुर्घटना झाली नसती तर तुमचे डोळेच उघडले नसते', हायकोर्टानं सिडकोला खडसावलं 
T20 World Cup 2024 :  पाच खेळाडू चालले, तर टीम इंडिया जिंकणार टी20 विश्वचषक
T20 World Cup 2024 : पाच खेळाडू चालले, तर टीम इंडिया जिंकणार टी20 विश्वचषक
Embed widget