MB NEWS-सेवा पंधरवाडा' अंतर्गत कंकालेश्वर मंदिर, शहेनशाहवली दर्गा, बौध्दविहारात केली स्वच्छता* *परळीत केले रक्तदान शिबीराचे उदघाटन*

 *पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमांतर्गत पंकजाताई मुंडेंचे बीडमध्ये स्वच्छता अभियान* 


*'सेवा पंधरवाडा' अंतर्गत  कंकालेश्वर मंदिर, शहेनशाहवली दर्गा, बौध्दविहारात केली स्वच्छता* 



*परळीत केले रक्तदान शिबीराचे उदघाटन*


बीड/परळी ।दिनांक २४।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीने संपूर्ण देशात होत असलेल्या 'सेवा पंधरवाडा' उपक्रमातंर्गत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी बीडमध्ये विविध धर्मियांच्या श्रध्दास्थानावर स्वतः हातात झाडू घेत स्वच्छता मोहिम राबवली तर परळीत रक्तदान शिबीराचे उदघाटन केले.

Click &watch:■ नवीन आष्टी-नगर रेल्वे उद्घाटन | कार्यक्रमातील असा भावूक प्रसंग | प्रत्येकाचे पाणावले डोळे.

   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या दरम्यान भाजपच्या वतीने 'सेवा पंधरवडा' राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज शहरात भाजपच्या वतीने घेण्यात आलेल्या सेवा उपक्रमात पंकजाताई मुंडे स्वतः सहभागी झाल्या. प्रसिध्द अशा कंकालेश्वर मंदिर, शहेनशाह वली दर्गा आणि माळीवेस भागातील बौध्दविहारात त्यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. यावेळी उपस्थित नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, सलीम जहांगीर, सर्जेराव तांदळे, स्वप्नील गलधर, भगीरथ बियाणी, नवनाथ शिराळे, अजय सवई, चंद्रकांत फड, प्रा. देविदास नागरगोजे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Click &watch:भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग चरणी नतमस्तक.

   दरम्यान, स्वच्छता अभियान हा एक संदेश आहे. आपल्या श्रध्दास्थानाची, परिसराची स्वच्छता राखण्यासाठी  सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं


*परळीत रक्तदान शिबीर* 

----------

याच उपक्रमांतर्गत भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांच्या पुढाकाराने परळी येथे उप जिल्हा रूग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराचे उदघाटन पंकजाताई मुंडे व खा. डाॅ  प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते मोठया उत्साहात झाले. यावेळी नागरिक व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येत उपस्थित राहून रक्तदान केले. भाजप व युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?