ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञानकृषी सल्ला
ट्रेंडिंग

Coriander (Kothimbir) Cultivation | बारमाही मागणी असणारी कोथिंबीर ठरेल फायदेशीर ! जाणून घ्या आली लागवड पद्धती…

Coriander (Kothimbir) Cultivation | कोथिंबीर ला वर्षभर सर्वात जास्त मागणी असते.उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर चे उत्पन्न कमी निघत असले तरी मागणी प्रचंड असल्याने बाजारात चांगला भाव मिळतो त्यामुळे बरेच शेतकरी उन्हाळ्यात देखील कोथिंबीर लागवड करतात. व्यापारीदृष्ट्या कोथिंबीर लागवड नवीन तंत्रज्ञानाने करावी. कोथिंबिरीची लागवड सुधारित पद्धतीने करणे फायद्याचे ठरते.

वाचा: आता बहुस्तरीय भाजीपाला पद्धतीमुळे दुप्पट नाही तर चार पट होतो फायदा ..जाणून घ्या या शेती बद्दल सविस्तर माहिती..

Coriander Farming | कोथिंबीर लागवड :

  • कोथिंबीरीच्या लागवडीसाठी लागणारी जमीन मध्यम कसदार आणि मध्यम खोलीची असावी. जमिनीत सेंद्रिय खतांची निवड करावी. कोथिंबीरीची लागवड कोणत्याही हवामानात केली जाते.आधी सांगितल्या प्रमाणे उन्हाळ्यात कोथिंबीरीची वाढ कमी असते पण मागणी जास्त असल्याने बाजारात भाव चांगला असतो त्यामुळे पाण्याची उपलब्दता असेल तर उन्हाळ्यात देखील कोथिंबीर लागवड करून जास्त नफा मिळवता येतो.
  • कोथिंबीर साठी जमिनीची चांगली मशागत आगोदर करून घ्यावे.जमिनीत एकरी ६ ते ८ टन चांगले कुजलेले शेणखत घालावे.त्यानंतर ३×२ मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावे. आपण ह्या वाफ्यात बी फेकून लागवड करू शकतो. बी फेकून लागवड करताना बी सारखे पडेल ह्याची काळजी घ्यावी. बी फेकून लागवड करायची नसेल तर वाफयामध्ये १५ से.मी. अंतरावर खुरप्याने ओळी पाडून त्यात बी पेरु शकतो.
  • तर लागवणिपूर्वी शेत ओलावून घेणे हे आवश्यक आहे त्यामुळे उगवण क्षमता वाढते पाणी देण्यासाठी सारी पद्धतीचा वापर करावा लागवडीनंतर हलकेसे पाणी द्यावे यामुळे बी वाहून जात नाहीपुढचा मुद्दा म्हणजे रोग व किडी तर कोथिंबिरीवर रोग व किडी जास्त आढळून येत नाही काहीवेळा भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो पाण्यात विरघळणारे गंधक त्याची फवारणी करावी.

Improved Varieties | सुधारित जाती:

व्ही 1, व्ही 2, को-१, डी-९२, डी-९४, जे २१४, के ४५, कोइमतूर-१, कोइमतूर-२, लाम सी.एस.- २, लाम सी.एस.- ४, स्थानिक वाण, जळगाव धना, वाई धना या कोथिंबीरीच्या, स्थासनिक आणि सुधारित जाती लागवडीसाठी वापरली जातात.

Harvesting of Coriander | काढणी व उत्पादन:
पेरणी नंतर ३५ ते ४० दिवसानी कोथिंबीर १५ ते २० से.मी. उंचीची होते त्यावेळी ती उपटून किंवा कापून काढणी करावी. पेरणीच्या २ महिन्यांनंतर कोथिंबीरीला फुले यायला सुरवात होते त्यामुळे त्या आधीच काढणी करणे महत्वाचे आहे.पावसाळी आणि हिवाळी हंगामात हिरव्या कोथिंबीरीचे एकरी ४ ते ६ टन उत्पादन मिळते तर उन्हााळी हंगामात हेच उत्पादन २.५ ते ३.५ टन मिळते.

– ऋतुजा ल. निकम ( MBA AGRI)

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button