MB NEWS-परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन

 परळी तालुक्यातील 21 कोटी 89 लाख रुपयांच्या 19 बंधाऱ्यांचे शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते पांगरी येथे भूमिपूजन



*कोल्हापूरी पद्धतीचे 10 तर गेटेड पद्धतीचे 9 बंधारे बांधण्यात येणार*


परळी (दि. 20) - परळी तालुक्यातील पांगरी (गोपीनाथ गड) व परिसरात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या 19 बंधाऱ्यांच्या कामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. 21) ग्रामपंचायत कार्यालय पांगरी येथे सायंकाळी 6 वा. करण्यात येणार आहे. 


एकूण 21 कोटी 89 लक्ष रुपये खर्चून 10 कोल्हापुरी पद्धतीचे व 9 गेटेड असे एकूण 19 बंधारे बांधण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाने निधी उपलब्ध करून दिला आहे. 


कोल्हापुरी पद्धतीचे पांगरी 1, इंजेगाव 1, कौठळी 1, कौडगाव घोडा 1, कौडगाव साबळा 1, सिरसाळ्यात 1, जयगाव 1, पोहनेर 1, हिवरा गोवर्धन 1, हसनाबाद 1 असे दहा तर गेटेड पद्धतीचे नागापूर 1, लिंबुटा 1, गाडे पिंपळगाव 3, हिवरा गोवर्धन 1, मैदवाडी 2 आणि वानटाकळी 1 असे 9 बंधारे बांधण्यात येणार आहेत. 


या 19 बंधाऱ्यांच्या कामाचे भूमिपूजन धनंजय मुंडे यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी 6वा. ग्रामपंचायत कार्यालय पांगरी येथे होणार असून या कार्यक्रमास आ. संजय भाऊ दौंड, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाल्मिक अण्णा कराड, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी श्री. परांडे यांसह आदी उपस्थित राहणार असल्याचे पांगरीच्या सरपंच सौ. अक्षताताई सुशील कराड यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा/पहा🔸

खालील ओळींवर क्लिक करा आणि वाचा/पहा आपल्या आवडीच्या बातम्या 👇👇👇👇

• दुर्दैवी:पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

• परळीत मान्सुनपुर्व पावसाचे जोरदार आगमन. उष्णता कमी; काहीसं गार गार वातावरण* _MB NEWS ला Subscribe करा_

• आनंदवार्ता:परळीत तिसऱ्या कोर्टाची निर्मिती !

• वैद्यकीय महविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावाखाली १४ लाखांची फसवणूक

• मायेचा ओलावा, स्नेहाचा वर्षाव व शानदार समारंभ : वसंतराव देशमुख गुरुजींचा सहस्त्रचंद्र दर्शन सन्मान

• ★१ मे नंतर गाळप झालेल्या व होणाऱ्या ऊसाला प्रति टन २०० रुपये अनुदान

• महाराष्ट्र सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचे नाही का ?- पंकजाताई मुंडे यांचा सवाल

•  हिंदू खाटीक समाजाच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?