ताज्या बातम्या

New Tata Cars| टाटाच्या ‘या’ गाड्या घेणार नवीन रुप, बाजारात होणार ग्रँड एन्ट्री; काय आहेत फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

New Tata Cars| भारतातील चार चाकी गाड्यांच्या विश्वातील विश्वासार्ह ब्रँड म्हणजे टाटा. हाच टाटा आता आपल्या काही कार्स मध्ये नवीन अपडेट सह बाजारात उतरणार आहे. येत्या महिन्यात ह्या कार बाजारात धमाकेदार एन्ट्री करणार आहेत. यामुळे या कार्स मध्ये नवीन काय फीचर्स असणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.

या आहेत कार्स

टाटा ज्या कार्स मध्ये अपडेटेड व्हर्जन आणणार आहे त्या कार्स आहेत Nexon, Harrier, Safari SUV. तसंच Altroz ​​ही CNG व्हर्जन मध्ये आणि रेसर एडिशन मध्ये उपलब्ध होणार आहे. टाटा पंच देखील सीएनजी व्हर्जन सह लाँच होणार आहे. 

TATA ALTROZ

ही कार रेसर एडिशनमध्ये उपलब्ध होणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच ऑटो एक्सपोमध्ये ही कार पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आली होती. या कारमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्यं असणार आहेत. स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7 इंच TFT डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड सीट, वायरलेस फोन चार्जिंग आणि ६ एअरबॅग्ज असणार आहेत. तसंच यामध्ये हॅचबॅक 1.2L, 3-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन असणार आहे. या इंजिनची क्षमता 5500 rpm वर 120 PS कमाल पॉवर आणि 1750 rpm ते 4000 rpm दरम्यान 170 Nm पीक टॉर्क निर्माण करण्याची आहे. असेच फीचर्स असणारी दुसरी कार म्हणजे Hyundai i20 N या दोन्ही कारमध्ये कोणती कार भाव खाऊन जाईल हे काळच ठरवेल.

TATA PUNCH CNG

टाटा पंच आता सीएनजी मध्ये उपलब्ध होणार आहे. टाटानं दिलेल्या माहितीनुसार या कारमध्ये 1.2 L पेट्रोल इंजिन,फॅक्टरी फिटेड CNG किट असणार आहे. या इंजिनमध्ये 77 PS कमाल पॉवर आणि CNG वर 95 Nm पीक टॉर्क जनरेट करण्याची शक्ती आहे. सोबत 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असेल. Altroz ​​CNG आणि पंच CNG ला नवीन ड्युअल सिलिंडर सेटअप असणार आहे. या प्रत्येक सिलेंडरची क्षमता 30 लीटर असेल. या नवीन व्हर्जनसह येणाऱ्या गाड्यांवर ग्राहकांच्या कशा उड्या पडतात हे येत्या महिन्यात उघड होईलच.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button