एक्स्प्लोर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा; सरकारकडून 10 हजार कोटींपैकी 2289 कोटी वितरित

दिवाळीआधी आज 2 हजार 289 कोटी देत असलो तरी दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे उर्वरित पैसे देऊ. संपूर्ण नुकसानभरपाई दिवाळी आधी देण्याची आमची तयारी होती, मात्र अचानक निवडणूक जाहीर झाली, त्यामुळे काही अडचण निर्माण झाली.

नागपूर : सरकारी मदतीची वाट पाहणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी 2297 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचे आदेश आज काढण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पूरग्रस्त भागाचा दौरा करून 10 हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल असे जाहीर केले होते.

आज निवडणूक आयोगाने पत्र पाठवून मदत वाटपाबद्दलच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जो 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे, त्यापैकी आज 2 हजार 289 कोटी वितरित करण्यात आले आहेत. हा सर्व निधी शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान यासाठीच द्यावा अशी सूचना दिली आहे, असं मदन आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

दिवाळीआधी आज 2 हजार 289 कोटी देत असलो तरी दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे उर्वरित पैसे देऊ. संपूर्ण नुकसानभरपाई दिवाळी आधी देण्याची आमची तयारी होती, मात्र अचानक निवडणूक जाहीर झाली, त्यामुळे काही अडचण निर्माण झाली. मात्र, आम्ही निवडणूक आयोगाची विशेष परवानगी मागून ही मदत देत आहोत. काल काही बातम्यांमध्ये विदर्भाच्या वाट्याला अवघे 8 कोटी असा उल्लेख होता, त्यात तथ्य नाही. उलट विदर्भाला 566 कोटींचा निधी देणार आहोत, असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान संदर्भात एकूण 4 हजार 700 कोटी देणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

सरकारी मदतीची विभागवार माहिती

विदर्भ - 566 कोटी मराठवाडा - 2 हजार 639 कोटी उत्तर महाराष्ट्र - 450 कोटी पश्चिम महाराष्ट्र- 721 कोटी कोकण - 104 कोटी

या 4 हजार 700 कोटींपैकी आज 2 हजार 289 कोटी वाटप केले जाणार आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या असा रोजच गळा काढणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी केंद्राकडे अतिरिक्त मदतीसाठी किमान साधं पत्र तरी लिहावं, असा टोलाही त्यांनी लगावला. आज जे 2 हजार 289 कोटी रुपये सरकार देत आहे, ते जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा होतील. त्यानंतर ते बँकांकडे जाईल. बँकांना शेतकऱ्यांच्या याद्या तयार ठेवण्यास सांगितले होते. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एमएस धोनी टी20 वर्ल्ड कप खेळणार? वीरेंद्र सहवाग आणि इरफान पठाण काय म्हणाले... 
एमएस धोनी टी20 वर्ल्ड कप खेळणार? वीरेंद्र सहवाग आणि इरफान पठाण काय म्हणाले... 
Aamir Khan :
"माझी मुलं माझं ऐकत नाहीत"; 'कपिल शर्मा शो'मध्ये आमिर खानने मांडली व्यथा
शरद पवार म्हणाले, अमरावतीकरांची माफी मागतो, आता अमित शाहांचा सवाल, त्या कुटुंबांची माफी कधी मागणार?
शरद पवार म्हणाले, अमरावतीकरांची माफी मागतो, आता अमित शाहांचा सवाल, त्या कुटुंबांची माफी कधी मागणार?
बारामतीतील धक्कादायक घटना! लाईट बिल जास्त आल्याने महावितरण कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार, महिलेचा मृत्यू
बारामतीतील धक्कादायक घटना! लाईट बिल जास्त आल्याने महावितरण कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार, महिलेचा मृत्यू
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shah Speech:कृषीमंत्री असताना आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबाची पवारांनी माफी मागावी:अमित शाहBaramati Crime : लाईट बिल जास्त येत असल्याची तक्रार न घेतल्यानं महिला कर्मचाऱ्यावर कोयत्यानं वारPankaja Munde Dhananjay Munde : बीडमध्ये पंकजाताई-धनुभाऊ एका मंचावर, मुंडे भावंड भावूकRahul Gandhi Speech:सत्तेत आल्यास कर्जमाफी आणि कृषी आयोगाच्या स्थापनेचं आश्वासन,राहुल गांधींची घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एमएस धोनी टी20 वर्ल्ड कप खेळणार? वीरेंद्र सहवाग आणि इरफान पठाण काय म्हणाले... 
एमएस धोनी टी20 वर्ल्ड कप खेळणार? वीरेंद्र सहवाग आणि इरफान पठाण काय म्हणाले... 
Aamir Khan :
"माझी मुलं माझं ऐकत नाहीत"; 'कपिल शर्मा शो'मध्ये आमिर खानने मांडली व्यथा
शरद पवार म्हणाले, अमरावतीकरांची माफी मागतो, आता अमित शाहांचा सवाल, त्या कुटुंबांची माफी कधी मागणार?
शरद पवार म्हणाले, अमरावतीकरांची माफी मागतो, आता अमित शाहांचा सवाल, त्या कुटुंबांची माफी कधी मागणार?
बारामतीतील धक्कादायक घटना! लाईट बिल जास्त आल्याने महावितरण कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार, महिलेचा मृत्यू
बारामतीतील धक्कादायक घटना! लाईट बिल जास्त आल्याने महावितरण कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार, महिलेचा मृत्यू
Navneet Rana : मी तुमच्यासाठी रक्ताचं पाणी केलंय, आता अमरावतीकर विरोधकांना पाणी पाजतील; नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल
मी तुमच्यासाठी रक्ताचं पाणी केलंय, आता अमरावतीकर विरोधकांना पाणी पाजतील; नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल
टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड, इरफान पठाणने निवडले 15 शिलेदार!
टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड, इरफान पठाणने निवडले 15 शिलेदार!
Nitin Gadkari: तू न थकेगा कभी.. भोवळ येऊनही गडकरी पुन्हा भाषणाला उभे, विकासाचं व्हिजन मांडलं!
Nitin Gadkari: तू न थकेगा कभी.. भोवळ येऊनही गडकरी पुन्हा भाषणाला उभे, विकासाचं व्हिजन मांडलं!
Vinod Patil : छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून विनोद पाटलांची माघार; कार्यकर्त्यांच्या बैठकीत मोठी घोषणा
छत्रपती संभाजी नगर लोकसभेला विनोद पाटलांची माघार; दोन आमदार, एक खासदाराने विरोध केल्याचा आरोप
Embed widget