मी E-शेतकरी

देशभरात तब्बल 43 लाखांहून शेतकऱ्यांचा कल “या” शेतीकडे..

मुंबई : देशात मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेती केली जावी यासाठी केंद्र सरकार कायम प्रयत्नशील आहे. केंद्रशासनाकडून यासाठी विविध योजना देखील राबविण्यात आल्या असून मध्यंतरी कृषी मंत्रालयाकडून सर्व शेतकऱ्यांना झिरो बजेट नैसर्गिक शेती संदर्भात संदेश देण्यात आला होता.

सध्या देशभरातील ४३ लाख ३८ हजार ४९५ शेतकरी हे सेंद्रिय शेती करत असून मध्यप्रदेश मधील शेतकऱ्यांची संख्या यामध्ये जास्त आहे. मध्यप्रदेश मधील सुमारे ७ लाख ७३ हजार शेतकरी सेंद्रिय शेती करतात.

म्हणून मध्यप्रदेशात सेंद्रिय शेतीचे क्षेत्र जास्त.

मध्यप्रदेश सरकारने मध्ये २००१- ०२ पासूनच सेंद्रिय शेती साठी काम सुरू केले होते.या राज्यात सध्या १७ लाख ३१ हजार हेक्टर क्षेत्रात सेंद्रिय शेती केली जाते.विविध कृषी योजनांबाबतची जनजागृती व सेंद्रिय शेतीचे फायदे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याने मध्यप्रदेश मध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय शेती करतात.

विचार करून विस्तार करणे आवश्यक

आयसीएआरने स्थापन केलेल्या पॅनलमधील तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार देशात सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढल्यास कृषी क्षेत्रातील उत्पादन कमी होऊन भारताच्या अन्नपुरवठा विभागाचसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते असे सांगण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी व सरकारने सेंद्रिय शेतीसाठी विचारपुर्वक नियोजन करणे गरजेचे आहे. भारतीय कृषी संशोधन समितीने यासाठी आंतरपीक, पीक विविधिकरण आणि एकात्मिक पोषक तत्व याचा वापर करून उत्पादन वाढू शकते असे मत देखील व्यक्त केले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा


Posted

in

by

Tags: